गणपती विसर्जन पारंपरिक पद्धतीने करू द्या - हिंदू जनजागृती समिती, प्रशासनास दिले निवेदन.
कोपरगाव प्रतिनिधी:--- श्री गणेश मूर्तीचे विसर्जन हे धार्मिक प्रथेप्रमाणे करण्यास प्रशासनाने आडकाठी आणू नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. कृत्रिम तलावात गणपती विसर्जन केल्याने त्याचप्रमाणे मूर्तीदान मोहिम राबविण्यात येते. संकलित केलेल्या मूर्ती योग्य पद्धतीने विसर्जन न केल्याने श्री गणेशाचे मोठ्या प्रमाणात विडंबन झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जलप्रदूषणाचे कारण देत पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गणपती विसर्जनास प्रशासनाने आडकाठी आणू नये अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समितीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी, कोपरगांव नगरपरिषद तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी दिलीप सारंगधर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे कृष्णा दळवी, विनोद शेलार, कान्हा हाडा, शुभम उगले, अशोक नायकुडे, आकाश साटोटे, अनिकेत पेंढारे, नितीन घुगे, गणेश भसाळे, रोहित उगमुगले, भरत कंकळ, शुभम जहाडदे, यश कुहीरे, सत्यनारायण यादव, वैभव शेलार आदी उपस्थित होते.
0 Comments