आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

मतदार संघाच्या विकासाला चालना देऊन शासनाच्या योजनांचा लाभ२५ हजार गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला – आ. आशुतोष काळे

 मतदार संघाच्या विकासाला  चालना देऊन शासनाच्या योजनांचा लाभ२५ हजार गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी:----- विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी चार वर्षात २१०० कोटी रुपये निधी आणला असून मतदार संघाच्या विकासाला चालना देवून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील सर्व सामान्य २५ हजार  गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून आजपर्यंत २१०० कोटी निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. या निधीच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न व शहर विकास, मतदार संघातील ७० गावांच्या पाणी पुरवठा योजना, गोदावरी कालव्यांची दुरुस्ती, महत्वाच्या राष्ट्रीय व राज्य मार्गांचा विकास त्याचबरोबर मतदार संघातील अंतर्गत रस्ते, काकडी विमानतळ विकास, विजेचे प्रश्न तसेच आरोग्याचे प्रश्न सोडविले असून अजूनही हजारो कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मतदार संघाच्या पश्चिम भागातील मंजूर बंधाऱ्याचे नूतनीकरण, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी एम.आय.डी. सी. निर्मिती, उर्वरित रस्ते अशा अनेक विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.



त्याच बरोबर मागील काही वर्षापासून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असून देखील वंचित असणाऱ्या मतदार संघातील गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. ज्या पात्र नागरिकांना लाभ घेण्यात अडी अडचणी होत्या त्या अडचणी दूर करून अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेवून हा उपक्रम यशस्वीपणे राबवून आजपर्यंत महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपालिका, कृषी विभाग, दिव्यांग विभाग, इतरही शासनाच्या ज्या काही योजना असतील, अशा सर्व योजनांचा तालुक्यातील जवळपास २५ ते ३० हजार गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. समाजातील गरजू लाभार्थी शोधून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्या लाभार्थ्याला लवकरात लवकर शासनाच्या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून हजारो लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. काकडी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात देखील मतदार संघातील १८०० गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेस पात्र ठरल्याच्या मंजुरीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

आशुतोष काळेंचा स्तुत्य उपक्रम दिव्यांगासाठी मोफत वाहन व्यवस्था

चौकट :- कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांग बांधवांना तपासणीसाठी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पीटलला जावे लागते. त्यासाठी दिव्यांग बांधवांचा आर्थिक खर्च व होणारा त्रास कमी करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून दिव्यांग बांधव व त्यांच्या समवेत एका जवळच्या नातेवाईकास अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पीटलला जाण्या-येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली असून हा उपक्रम नियमितपणे सुरु असल्यामुळे हजारो दिव्यांग बंधू भगिनींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments