सनातन भारतीय संस्कृती संस्थेमार्फत व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन.
कोपरगाव प्रतिनिधी:----- सनातन भारतीय संस्कृती संस्थेमार्फत येवला येथील आत्मा मालिक गुरुकुल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन २९ जूलै रोजी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. आपल्या दोषांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर व जगण्यावर खूप परिणाम होत असतो. दोषांमुळे आनंदी जगणं अवघड असते. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येतो, चिड चिड होते. गुण असुनही त्याचा लाभ करून घेता येत नाही.
लाजरेपणामुळे प्रत्येक ठिकाणी मागे राहतो. दोषांवर मात कशी करायची यासाठी स्वयंसुचना घेऊन व कृतीच्या स्तरावर सर्व प्रयत्न करुन आपण त्या दोषांवर मात करून आजची पिढी उद्याचे कर्तव्य निष्ठ व सुजान नागरिक होऊ शकतात व आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगू शकतात. या संस्थेमार्फत असे अनेक उपक्रम राबविले जातात. या मार्गदर्शनाचा ३५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
0 Comments