धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा वन आधिकाऱ्यांनी तात्काळ बंदोबस्त करावा.-- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.
कोपरगाव प्रतिनिधी:---- गेल्या दोन दिवसापासून कोपरगाव शहरातील इंदिरपथ भागात तसेच बैल बाजार रोड परिसरात बिबट्या दिसला आहे.
शाळेत जाणारे मुलं मुली यांचे आई वडील मोठ्या प्रमाणात धास्तावलेले आहेत . तरी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत या बिबट्याने मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,सकाळी फिरायला जाणारी लोक घाबरत आहेत.
पिंजरे नाही , मनुष्यबळ नाही , भक्ष नाही , निधी नाही ,वाहन नाही पण वन्यजीव हल्ला केला तर १०लाख रोख १०लाख डिपाझिट वारसांना व्याज शासन निर्णय झाला आहे.असे कळते
पण जीव गेल्यानंतर या रकमेचा काय उपयोग.
गेल्या दोन दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .आतापर्यंत कुठली वाईट घटना घडली नाही. तरी वन्य अधिकारी यांनी तात्काळ पिंजऱ्याची व्यवस्था करावी व बिबट्याच्या बाबतीतली योग्य ती बातमी, ठावठिकाणा जनतेपुढं सांगावी व मार्गदर्शन करावे.कोणी सांगते की शंकर नगर , ओम नगर भागात गेला, दिसला.
लोक घाबरल्याने रात्रीचे जागरण करत आहे. तसेच कुत्रे मोठ्या प्रमाणात या भागात भुकत आहे.
तरी तात्काळ या भीतीच्या वातावरणातून वन्य अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी अशी मंगेश पाटील मागणी त्यांनी शेवटी केली आहे.
0 Comments