"कर्तव्य"या पुस्तिकेचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी होणार प्रकाशन.
कोपरगाव प्रतिनिधी:----
कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या "कर्तव्य" या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 30 रोजी सायंकाळी ६ वा.होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओमप्रकाश तथा काका कोयटे हे असणार आहेत. माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव शहरामध्ये आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये शहरातील विविध ठिकाणी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा या पुस्तकाच्या माध्यमातून ते जनतेसमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे विनायक गायकवाड यांनी दिली आहे. या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम विनायक गायकवाड यांच्या निवासस्थानी सह्याद्री कॉलनी, गोकुळ नगरी शेजारी या ठिकाणी होणार आहे तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
0 Comments