आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव" हे जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय, व्हावे यासाठी कोपरगाव बंदची हाक दिली पाहिजे.--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

 "कोपरगाव" हे जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय, व्हावे यासाठी कोपरगाव बंदची हाक दिली पाहिजे.---  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

 



कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव हे जिल्हाचे मुख्यालय किंवा जिल्हा झाला पाहिजे या साठी श्रीरामपूरकरां प्रमाणे  आपण देखील बंद ची हाख दिली पाहिजे असे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे. याविषयी सविस्तर बोलताना ते पुढे म्हणाले की,

कोपरगाव करांनीही  वरील मागणी साठी  आंदोलन केले पाहिजे. कोपरगाव जिल्हा किंवा जिल्हाचे मुख्यालय झाले तर नुसतेच शहराची नाही तर संपूर्ण तालुक्याची कायम स्वरुपी बाजारपेठ  सुधारून जाईल. रोजगार मोठ्या प्रमाणात वाढेल.तसेच भरपूर  निधी  मिळेल.जे अनेक वर्षांपासून आज पर्यंत प्रत्येक नागरिकांना वाटते की आपले कोपरगाव हे पूर्वी प्रमाणे कॅलिफोर्निया झाले पाहिजे. आणि कोणताच मुलगा गाव सोडून जाणार नाही व रिटायर्ड सिटी हे नाव पुसले जाईल.सर्व  छोट्या मोठ्या व्यापारी मंडळींनी , तरुणांनी , महिला मंडळांनी पक्ष विरहित या साठी पुढे,  येऊन पुढाकार घेऊन आपल्या गावच्या व्यापार वाढीसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी  पुढे आले पाहिजे.

अजून वेळ हातात आहे.तरी सर्वांनी ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या मागणी साठी पुढे आले पाहिजे. पक्ष विरहित आपल्या आपल्या नेते मंडळीना घेऊन हे केले तर यश मिळू शकते. अन्यथा पुढची पिढी ,तरुण वर्ग माफ करणार नाही. व ही आलेले विकासाची संधीला कोपरगावकर कायम स्वरुपी मुकतील.तरी आत्ताच परत शासनाकडे मागणी केली पाहिजे.बंद ची हाक दिल्याने शासन गांभीर्याने विचार करेल.कोपरगाव हे हायवे ला आहे.रेल्वे स्टेशन, मोठे बस स्टँड , विमानतळ हे कोपरगाव तालुक्यात आहे , समृध्दी चे लँडिंग कोपरगाव च्या हद्दीत आहे , शेती महामंडळाच्या जमिनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.पौराणिक धार्मिक पर्यटन स्थळ ही आहेत.असे अनेक जिल्हा होण्यासारखा गोष्टी तालुक्यात आहेत.या साठी सर्वांनी एकत्र येऊन मागणी करावी.

असे पत्रकात माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी  शेवटी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments