आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पालिकेने स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने नदीपात्रापर्यंत नवीन घाट बांधावा. --- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

 पालिकेने स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने नदीपात्रापर्यंत नवीन घाट  बांधावा.  ---  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

                 


कोपरगाव प्रतिनिधी :- शहराच्या लगत स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने खूप लांब असा घाट व त्याला नदीपात्राच्या आतपर्यंत पायऱ्या नगरपालिकेने बांधाव्यात. अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे त्यात पुढे म्हटले आहे की,

 गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर शहरातील  महिला माता भगिनी मोठ्या प्रमाणात गोदावरी मातेची पूजा करायला येतात. कोणी नुसते दर्शन घेऊन पायावर पाणी घेतात.

               त्याचप्रमाणे गणपती विसर्जनाच्या वेळी लोकांना जागा राहत नाही. कारण नदीला पूर असतो आणि कधी खूप खोल पाणी असते . लोकांना गणपती  विसर्जन  वाहत्या पाण्यात  झालं पाहिजे अशी प्रत्येक नागरिकाची   इच्छा असते.

 शहरात नदीकिनारी स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुंदर असा घाट होईल अशी जागा आहे . त्यामुळे जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून तसेच पौर्णिमा ,अमावस्या ,प्रदोष, श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी आंघोळीला येतात तसेच शिर्डीलाही जाताना कोपरगाव मधून कावड भरून लोक पायी साईबाबांना जातात.

            यासाठी नगरपालिकेने स्वामी समर्थ मदिराचे गुरू माऊली यांची परवानगी घेऊन तात्काळ  सुंदर असा पक्का घाट व त्याला सुरक्षित असे संरक्षण कठडे खालपर्यंत  बांधावेत जेणेकरून कोणी वाहून जाणार नाही.

          कोपरगाव शहराला ऐतिहासिक असे महत्त्व प्राप्त आहे .कोपरगाव शहरात बेट  भागात शुक्राचार्य भगवान व कचेश्वर भगवान यांचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर प्रमाणे कचेश्वर मंदिरात सर्व धार्मिक विधी वर्षभर होऊ शकतात इतके महत्त्व या स्थानाला आहे. विधी केल्यानंतर बराच वेळा नदीमध्ये स्नान करावे लागते.  विधी पूजा झाल्यानंतर  स्नानासाठी योग्य अशी जागा अंघोळ करण्यासाठी नसल्याने ही विधी ची परंपरा लोप पावत चाललेली आहे. तरी आपला हा सांस्कृतिक वारसा टिकण्यासाठी व पुन्हा इथे पूजाअर्चा सुरू होण्यासाठी नदीच्या विरुद्ध बाजूने शुक्राचार्य घाट करण्यात आलेला आहे. त्याहून चांगला मोठा सुरक्षित घाट होणे खूप महत्त्वाचे आहे.

  कोपरगावकरांसाठी लवकर हा काँक्रीट चा आरसीसी घाट बांधून व त्यावर दगडी पायऱ्या करून करावा...

माता अहिल्याबाई होळकर यांनी ज्याप्रमाणे प्रत्येक संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या नदीकाठी भाविकांसाठी त्याकाळी मोठमोठे सुंदर असे दगडी घाट बांधले आहेत.याचा आदर्श नगरपालिकेने घ्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments