आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

मा. आ. कोल्हेंच्या दबावाला बळी न पडता गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी रस्त्याच्या कामाला प्राधान्य द्या - कृष्णा आढाव

मा. आ. कोल्हेंच्या दबावाला बळी न पडता

गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी रस्त्याच्या कामाला प्राधान्य द्या - कृष्णा आढाव.



कोपरगाव प्रतिनिधी:----- शहरातील गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मात्र हा रस्ता करू नये यासाठी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून त्या दबावाला बळी न पडता कोपरगाव नगरपरिषदेने गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी रस्त्याला प्राधान्य द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, बैल बाजार, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र हा रस्ता खराब झाल्यामुळे त्याचा परिणाम येथील व्यवसायावर झाला असून वर्दळ मंदावल्यामुळे व्यावसायीकांचे व्यवसाय थंडावले आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आजवर अनेक वेळा आ. आशुतोष काळे यांच्या मार्फत मागणी केलेली आहे. त्या मागणीचा विचार करून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून कोपरगाव नगरपरिषदेने गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली असून त्या कामाला तांत्रिक मंजुरी देखील देण्यात आली आहे. परंतु या रस्त्याचे काम न करता या रस्त्याच्या कामाचा निधी दुसऱ्याकडे वळवावा यासाठी माजी आमदार कोल्हे कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची माहिती मिळाली आहे.

 मात्र कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी माजी आमदारांच्या दबावाला बळी न पडता या  रस्त्याचे काम तातडीने हाती घेवून हे काम मार्गी लावावे.विरोधकांनी राजकारण करण्यासाठी दुसरे पर्याय शोधावेत मात्र विकासकामात राजकारण करू नये. यापूर्वीही विरोधकांनी २८ कामांना विरोध केल्यामुळे दोन वर्ष विकासापासून वंचित राहण्याची किंमत कोपरगावकरांनी मोजली आहे त्यामुळे त्यांच्या भावनांशी पुन्हा खेळू नका. दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय धोक्यात आले होते. आता कुठ तरी व्यवसायाची गाडी रुळावर येत असतांना माजी आमदार कोल्हे विकासकामात खोडा घालून व्यावसायिकांच्या व्यवसायात अडथळे निर्माण करीत आहेत. मात्र माजी आमदारांनी विकासकामात खोडा घालण्याची सवय बंद करून विकासकामांना सहकार्य करावे. हा रस्ता खराब झाल्यामुळे व्यावसायिकांना श्वसनाचे आजार देखील जडले आहेत. जर माजी आमदारांच्या दबावातून या रस्त्याच्या कामाचा निधी दुसरीकडे वळविल्यास व्यापाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा कृष्णा आढाव यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments