गणेश भेळ सेंटरचे मालक हिरालाल लाडे यांचे दुःखद निधन
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगावातील प्रसिद्ध असलेल्या गणेश भेळ सेंटरचे मालक कै हिरालाल पुंडलिक लाडे यांचे आज सोमवारी दिनांक 13/3/2023 रोजी रात्री 12.30 वा. वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले
कै. हिरालाल लाडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या व्यवसायातुन त्यांनी स्वतःची व परिवाराची ओळख निर्माण केली होती ते अत्यंत मनमिळावू, शांत, संयमी अशा स्वभावाचे होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे दुपारी दोनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कोपरगावासह आसपासच्या भागातील सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय आदि क्षेत्रातील मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी तसेच मुलगा
सोमनाथ हिरालाल लाडे व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ योगेश हिरालाल लाडे, दोन मुली जावई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .
0 Comments