आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

जनतेला अपेक्षित असलेली कामे व सुविधांसाठी मुख्याधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक बजेट सादर करावे.-----माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

 जनतेला अपेक्षित असलेली कामे व  सुविधांसाठी मुख्याधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक बजेट सादर करावे.-----माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

       


 कोपरगाव प्रतिनिधी:--------        नगरपालिका ही शासनाची सेवा व विकास करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे .  गेल्या सव्वा वर्षापासून निवडणुका लांबल्या असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष हे स्थानिक शहरातील प्रतिनिधी म्हणून नाही आहेत. त्यामुळें  प्रशासक व मुख्याधिकारी या दोन्ही पदाचे चार्ज ज्यांच्या कडे आहेत असे मुख्याधिकारी शांताराम  गोसावी  यांनी आगामी वर्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे  बजेट सादर करताना खूप विचारपूर्वक , जनहिताचा विचार करून व शहराचा विकासाच्या दृष्टीने  , विचारपूर्वक ,काळजीपूर्वक बजेट सादर करावे.

अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,

    फेब्रुवारी , मार्च महिना जवळ आला की पुढील वर्षाचे बजेट तरतूद हे सादर करावे लागते.नुकतेच केंद्र सरकारने आपले बजेट जाहीर केले .त्यानंतर आता महाराष्ट्र शासन लवकरच आपली बजेट जाहीर करेल .आत्ता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था हे ही बजेट सादर करतात.मग ते कलेक्टर व नंतर महाराष्ट्र शासनाकडे मंजरीसाठी जाते.

               या वर्षी कोपरगाव शहराची हद्दवाढ झाली आहे.शहरालगत चे सर्वे छोटी छोटी उपनगरे, भाग शहराला जोडल्या गेल्यामुळे शहर मोठे झाले आहे. पाणी , आरोग्य , लाईट , रस्ते , गटारी इत्यादी सुविधा लागतातच.

        जनतेला स्वच्छ रोज पाणी , आरोग्याची चांगली सुविधा स्वच्छ्ता , महिन्यातून एकदा डासासाठी औषध फवारणी , काही ठिकाणी पाण्याची पाईप लाईन टाकने , पाणी फिलट्रेशन , रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवण्याठी , सिव्हिल वर्क रिपेअर वर्क ची तरतूद ,धूळ रहित गाव करण्यासाठी , लहान मुलांना खेळायला गावातील सर्वे भागात छान अशा खेळणी सह बागा , ज्या त्या भागातील ओपन स्पेस,  मोकळ्या जागा विकसित झाल्या पाहिजे , ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित जॉगिंग ट्रॅक व त्यांनी ऐकत्र येऊन योगासने , हास्य क्लब या साठीही सोई व्हावी , अमरधाम मधील काही काम आजुन करावयाचे असल्यास त्या कामासाठी निधी, कब्रस्थान साठी , छानसे नाट्यगृह , शहरात पार्किंग ची सोय , ठीक ठिकाणी महिला व पुरुष यांचे साठी छोटेसे स्वच्छ अद्यावत सुलभ शौचालय  व त्याचे रिपेअर , मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड , ठीक ठिकाणी रोड च्या कडेला जनतेला त्रास होणार नाही असे मोजके आरोग्यासाठी उपकरणे छोटी जिम चे साहित्य साठी , टपरी धारक यांचे साठी शॉपिंग सेंटर , छोटे खोका शॉप , ठीक ठिकाणी हॉकर्स झोन करण्यासाठी , झाडे जगवने  हरित गाव करणे वाढवणे , अद्यावत कचरा कुंड्या , वाचनालयातील कमी असलेल्या सुविधांसाठी , नगरपालिका शाळा सुधारण्यासाठी, भाजी मार्केट , मच्छी मार्केट , मटण मार्केट सुविधा देऊन अद्यावत करण्यासाठी , कर्मचारी हित  सोय देयके .  इत्यादी नगरपालिकेचे देयके .अश्या अनेक बाबींचा विचार करून बजेट मध्ये गाव व गावाची बाजार पेठ कशी वाढेल या साठी तरतूद करावी. जेणेकरून इलेक्शन झाले की पुढील काळात नगराध्यक्ष व नगरसेवक यांना काम करणे सोपे  होईल.

                   गेल्या एक सव्वा वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहेत. त्यामुळे यावर्षी चे बजेट सादर करताना कोपरगाव च्या जनतेचा व शहर वाढीचा विचार करून आगामी पुढील एक वर्ष करावयाचे असलेले काम व त्यासाठी करावयाचे असलेले फायनान्शिअल बजेटचा व्यवस्थित विचार करून ते करावे . कोपरगाव शहराचा विचार जर केला तर शहरात जनतेला लागणाऱ्या सुविधा त्या त्याबद्दल सांगण्यासाठी नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष नाही आणि शहरातील सर्वच नागरिक हे मुख्याधिकारी यांच्यापर्यंत जात नाही किंवा पोहोचू शकत नाही.        

                  त्यामुळे जनतेला जे अपेक्षित आहे ,  जी काम व्हायला पाहिजे व ज्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारा खर्च हा मुख्याधिकारी हे सध्या प्रशासक असल्याने त्यांनी काळजीपूर्वक जनहिताचा विचार करूनच त्यांनी ते सादर करावे अन्यथा पुढील वर्ष येणाऱ्या इलेक्शन नंतर ,परत एक वर्ष विकासासाठी थांबवावे लागेल. ही जनतेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या कडे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments