"रस्त्यावर" पाणी सोडल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण,
तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल.
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार या ठिकाणी राहणाऱ्या महिला तिचा पती व सासू यांना लाकडी काठीने व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली असून याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तिघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे राहणाऱ्या महिलेस शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर पाणी सोडल्याच्या कारणावरून त्याच ठिकाणी राहणारे सुनील बाबुराव दरेकर प्रसाद सुनील दरेकर व प्रताप सुनील दरेकर या तिघांनी या महिलेच्या घरात घुसून तिचा पती व सासू व फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून लाकडी काठीने व लोखंडी गजाने मारहाण केली व व फिर्यादी महिलेचे वस्त्र फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग करण्यात आले असल्याचे देखील फिर्यादी महिलेने म्हटले आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपीं विरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२३ भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४,४५२,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एस बी बोटे हे करत आहे
0 Comments