कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण संपन्न.
कोपरगाव प्रतिनिधी:------- रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण व विविध गुणदर्शनाचा समारंभ नुकताच साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब रूईकर यांनी भुषविले. समारंभासाठी कन्या विद्यामंदिर येथील प्राचार्या सौ. सुरवसे ताई, पदमा मेहता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दरेकर सर, युसुफ रंगरेज, साहित्यिक हेमचंद्र भवर, पालक प्रतिनिधी शेख, माजी सैनिक रणदिवे, नगरसेवक रमेश गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक खाडे सर यांनी केले. सुत्रसंचलन कुमावत यांनी केले.
बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून अनेक बक्षिसे मिळविली.
समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
वलटे ताई, शिंदे ताई, पावले ताई, खिलारी ताई, ढाकणे ताई यांनी सहकार्य केले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार बिपिन गायकवाड उपस्थित होते.
0 Comments