सोमैया विद्या मंदिर साकरवाडी येथील विद्यार्थ्यांची विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत नेत्रदीपक यश
कोपरगाव प्रतिनिधी:----- क्रीडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद अहमदनगर आयोजित विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सोमैया विद्याविहार संचालित सोमैया विद्यामंदिर साकरवाडीच्या मुलींच्या संघाने गगन भरारी घेत अजिंक्यपद पटकाविले आहे व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोविला आहे. सोमैया विद्यामंदिर साकरवाडी हा संघ राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे या सर्वच मुली ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुली आहेत. विद्यार्थिनींनी मिळविलेले हे यश कोपरगाव तालुक्यासाठी नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी व पुणे विभागासाठी भूषणावह आहे. बॅडमिंटन या खेळावर पूर्ण देशात पुणेकरांचे वर्चस्व असताना साकरवाडी , वारी, कान्हेगाव सारख्या खेड्यातील मुलींनी मिळविलेले हे यश अवर्णनीय आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाचे पहिले श्रेय संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय श्री समीर सोमैया यांना जाते. श्री. समीर सोमैया यांनी तळागाळातील मुलामुलींना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच मोठ्या शहरांसारख्या सुविधा विद्यालयात उपलब्ध करून दिल्या. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे डायरेक्टर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सुहासजी गोडगे साहेब व व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी, सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख एजाज सर व त्यांची पूर्ण टीम जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिल्ले, विशाल गर्जे, मिलिंद कुलकर्णी यांनीही मुलामुलींना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे व सातत्याने करत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी अहोरात्र मेहनत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पारे घेत आहेत. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री अमोलिक सर, पर्यवेक्षक श्री खळदकर सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments