"ढिशक्यांव" चित्रपट येत्या १० फेब्रूवारी ला संपूर्ण महाराष्टात होणार प्रदर्शित.
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव चे भूमिपुत्र व अष्टपैलु व्यक्तिमत्व डॉ.अशोक गावित्रे निर्मित "ढिशक्याव" या मराठी चित्रपटाची टिम प्रमोशन निमित्त कोपरगांव शहरात दाखिल झाली होती, पत्रकार दिन नुकताच साजरा झाला त्या निमित्ताच औचित्य साधुन या मराठी चित्रपटाच्या टिम ने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान या संपूर्ण टीम च्या वतीने करण्यात आला व तदनंतर सायं.ठिक ४-५ या वेळेत पत्रकार परिषद पण आयोजित करण्यात आली होती या वेळी चित्रपट संदर्भात काही प्रश्न या टिम ला विचारण्यात आले टिम कडुन उपस्थित निर्माते डॉ अशोक गावित्रे यांनी निर्मीती संदर्भात तसेच दिग्दर्शक प्रितम पाटील यांनी चित्रपट संदर्भात माहीती दिली या वेळी चित्रपटातील नवीन चेहरा अभिनेते अहमद देशमुख, चित्रपट क्षेत्रात नुकतच पदार्पण केलेली अभिनेत्री मेघा शिंदे , चित्रपटात खलनायकाची भुमीका साकारणारे अभिनेता प्रसाद खैरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पा रंगल्या.
पत्रकार परिषद नंतर आ आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या मार्गदर्शना खाली प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित कोपरगांवकरांच्या आवडत्या व दरवर्षी आयोजित होणा-या गोदाकाठ मोहत्सवात प्रमोशन साठी या टिम च स्वागत जल्लोषात करण्यात आले , ज्या वेळेस संपुर्ण टिम च आगमण मंच्यावर झाले त्या वेळी सर्वत्र ढिशक्याव ढिशक्याव असा आवाज प्रेक्षकांत गर्जत होता , सौ चैताली काळे यांनी टिमचा सन्मान करत हा चित्रपट सर्वानी बघावा असा आवाहन सर्वाना केल गोदाकाठ मोहत्सवाच्या वतीने चित्रपटास शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर निर्माते डॉ अशोक गावित्रे सर , प्रितम पाटील , अभिनेते अहमद देशमुख व अभिनेत्री मेघा शिंदे यांस कडुन उपस्थित प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात आले व त्यास प्रेक्षकांचा ही उतुंग प्रतिसाद लाभलाआपल्या कोपरगाव च नाव चित्रपट क्षेत्रात देखील गाजणार यात काही शंकाच नाही तसेच आपल्या भागातील अनेक कलावंतांना आगामी येणाऱ्या चित्र पटात संधी देणार असून अनेक चित्र पट पूर्णत्वाच्या मार्गावर असून ते देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला य तील असं त्यांनी सांगि तला ढिशक्यांव हा चि त्रपट येत्या 10फेब्रूवारी ला संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित होत आहे चित्रपटाचा ट्रीझर दाखवून प्रमोशन चा समारोप करण्यात आला
0 Comments