नगरपालिकेने जबाबदारीने पुर्ण क्षमतेने तळे भरुन घ्यावे, ३ दिवसाआड पाणी पुरवठा करावा.--- माजी. नगराध्यक्ष.मंगेश पाटील.
कोपरगाव प्रतिनिधी:----- मागील दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेने अचानक २८ नोव्हेंबर ला पाणी आठवड्यातून एक दिवस म्हणजे ७ दिवसांनी पाणी देणार असे जाहीर केले. नागरिक विशेष करून महिला वर्ग खूप नाराज झाला. ख्रिसमस सन व मुलांना सुट्ट्या होत्या . नगरपालिकेने अचाणक पाणी दिवस पाटबंधारे विभाग यांनी कॅनॉल चे काम काढल्याचे सांगून पाणी दिवस वाढवले .या मुळे महिला वर्गाची खूप धावपळ झाली , त्यांना त्रास झाला. ऐकीकडे धरणे भरलेली असताना व नदीला पाणी असताना कोपरगाव वासियांना आठवड्यातून १ दिवस पाणी करण्यात आले.ही खेदाची गोष्ट आहे.
आत्ता कॅनॉल ला पाणी आले असून नगरपालिकेने सर्वे साठवन तळे पूर्ण क्षमतेने आत्ताच सुरवातीला व परत कॅनॉल बंद होताना लक्ष ठेऊन , काळजीने व जबाबदारीने भरून घ्यावे.जेणेकरून नागरिकांना येणाऱ्या काळात त्रास होणार नाही.त्यांची घैरसोय होणार नाही. कारण नगरपालिकेचा पाणी मंजूर कोठ्या पेक्षा नगरपालिका पाणी कमी घेते , कारण साठवण तळे गाळानी भरले असून , त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्या मुळे कॅनॉल सुटल्यावर व बंद होताना दोन्ही वेळा भरून घ्वावां,कारण आपल्याला आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मंजूर आहे आणि त्याची पट्टी नगरपालिका शासनाला पाटबंधारे विभागाला जनतेच्या कररुपी भरलेल्या पैशातून देते.
तरी नगरपालिकेनी पूर्वी प्रमाने 3 दिवसाआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी पुरवठा तात्काळ करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,
ही नगरपालिका प्रशासनाला मागणी व विनंती. जसे हक्कानी पाणी पट्टी वसूल करता व पाटबंधारे विभाग यांचे सुचणे नुसार पाणी दिवस तात्काळ वाढवतात ,तसे खरे तर जनतेनी मागणी न करता पाणी कॅनॉल ला आल्यावर पूर्वी प्रमाने लगेच मागणी करायला न लावता नगरपालिकेने स्वतः हुन पाणी दिवस कमी करायला पाहिजे होते.
असे ते शेवटी म्हणाले आहे. मात्र आता पालिका प्रशासन यावर कोणता निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे.
0 Comments