Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

शिव बालक मंदिर, शाळेच्या प्राचार्यपदी शिवाजीराव लावरेसर"

 " शिव बालक मंदिर, शाळेच्या प्राचार्यपदी शिवाजीराव लावरेसर"कोपरगाव प्रतिनिधी:----- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे ‌ मुल्यात्मक शिक्षण देणे, आदर्श मुलं घडवणं,हा माझा वसा आहे, आणि तो मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे गौरवोद्गार शिवाजीराव लावरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.

      याप्रसंगी देशमुख सर व सर्व सहकारी शिक्षक यांचे शिव बालक मंदिर उककडगाव शाळेच्या योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले. अतिशय खडतर वेळी देशमुख सर व सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका भक्कम शाळेच्या विकासासाठी झगडत राहिले, संस्था त्याचं मनापासून आभारी आहे.

   पदभार स्वीकारल्यानंतर देशमुख सर यांनी शिवाजीराव लावरेसर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच देशमुख सर यांचा ही शाळेच्या योगदानाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेने देशमुख सर यांच्यावर पुर्वीच्या सारखीच जबाबदारी टाकली आहे. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं, तसेच शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments