आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पठाण हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची मागणी

 पठाण हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची मागणी
कोपरगांव प्रतिनिधी :----  कोपरगांव शहरातील सुदेश या चित्रपटगृहात पठाण हा चित्रपट प्रसारीत करु नये अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल  कार्यकर्त्यांनी २६ डिसेंबर रोजी निवेदन देऊन केली आहे. ह्या चित्रपटात वादग्रस्त प्रसंग असून त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावत आहेत. सिनेमा तील बेशरम या गाण्यातुन भगव्या रंगाचा अपमान होत आहे. शाहरुख खान या अभिनेत्याने याआधीही अनेकदा हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदर चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी संघटनेने निवेदन देऊन केली. यावर चित्रपटगृह चालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत चित्रपट प्रसारीत करणार नसल्याचे आश्वासन दिले.यावेळी कृष्णा दळवी, शिवप्रसाद बढे, रोहन जोशी, केदार चोपडे, राकेश वाघ, सुरेश जाधव, सोनु सूर्यवंशी, विशाल बिडवे, ओमकार देवकर, नारायण कहार, विकी गाडेकर, दिनेश खडांगळे, प्रकाश आढाव, सोनू देवकर आदी उपस्थित होते.
Post a Comment

0 Comments