आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाटबंधारे विभागाच्या नावाखाली नगरपालिका स्वतः ची जबाबदारी लपवत आहे.-- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.


पाटबंधारे विभागाच्या नावाखाली नगरपालिका स्वतः ची जबाबदारी लपवत आहे.--  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील. 

 पुन्हा पहिले पाढे ५५ ,शहराला आठवड्यातून १दिवसच पाणी!


 

कोपरगाव प्रतिनिधी:--- नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला ६ दिवसा आड म्हणजे आठवड्यातून १ दिवस आता पाणी.

कोपरगाव शहराला पिण्याच्या पाणी प्रश्नावरून कायमच टांगती तलवार... सतत अन्याय पहिले पाढे ५५..आज नगरपालिकेने ६ दिवसाआड पाणी देणार असल्याचे प्रसार माध्यम तून जनतेला कळवले. ही जनते बरोबर चेष्टा व छळ नगरपालिका करत आहे, ही खेदाची गोष्ट आहे. अशी प्रखर टिका माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन केली आहे याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,

या मुळे नागरिकांमध्ये विशेष करून महिला भगिनी मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. 


 आत्ता महिना भर पूर्वी पाऊस बंद झाला. गोदावरी दोन्ही थड्या तुडुंब भरून वाहत होती. नासिक भागातील सर्व धरण भरले आहेत . औरंगाबाद/ पैठण चे जायवाडी धरण पूर्ण भरून वाहिले .असे असताना नगरपालिका पाठबंधारे विभाग व कॅनॉल रिपेअर च्य्या नावाखाली स्वतः ची चूक झाकण्याचे प्रयत्न करीत आहे. 3 दिवसाआड म्हणजे ४ थ्या दिवशी पाणी देत असताना भरपूर पाण्याची नासाडी होत होती , मोठ मोठी लिकेज रोड वर चालू होती . त्या कडे लक्ष दिले नाही , तसेच पाटबंधारे विभागाने पाणी पूर्ण क्षमतेने भरून दिले नाही या नावाखाली स्वतः ची जबाबदारी लपवत आहे. शेतकरी सोंगणीचा काळ असल्याने पाणी भरत नव्हते , ते पावसाळा कंटाळले होते . आणि कॅनॉल ला पाणी तसेच चालू असताना , येसगाव चे सर्व तळे भरून न घेतल्याने , दुर्लक्ष केल्याने नागरिकांची आत्ता हाल होणार आहे. लिकेजेस वाढल्याने घान पाणी येत आहे .या कडे ही पालिकेचे दुर्लक्ष केले. पाणी पट्टी वाढवली आणि नाही भरले तर कनेक्शन नगरपालिका लगेच तोडते . हे मात्र न चुकता करतात.मग स्वच्छ पाणी व नियमित पाणी यात नगरपालिका का लक्ष देत नाही ..शासन त्यांना या साठी पगार देते . याच्या ही पगारात व भाढतीत कपात करावी म्हणजे कळेल की जनतेला पट्टी भरताना व नळ कनेक्शन तोडताना नागरिकांना काय त्रास होतो. 

     कोपरगाव मधील बहुतांशी जनता संजय नगर , सुभाष नगर , गांधी नगर , टिळक नगर , नदी काठ, खडकी इत्यदी झोपडपट्टी भागात राहतात , तेथील भागातील महिला भगिनी ची खूप हाल आत्ता होणार आहे , कसे पाणी साठवायचे हा प्रश्न पडत आहे. 

       आधीच पिण्यासाठी कॅन घ्यावे लागत आहे , याचा ही भुर्दंड  जनतेच्या वाट्या ला येत आहे. आणि आत्ता आठवड्यातून १ दिवस पाणी . नागरिक जर बोलले नाहीत तर असे होत राहणार .बोलून कशाला वाईट व्ह्यायचे असे जर जनता गप्प राहिली तर असेच होतं राहणार.असे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments