आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

दगड टाकून ठेवलेला तो शॉर्टकट डांबरी रोड नगरपालिका कधी पूर्ण करणार?--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

 दगड टाकून ठेवलेला तो शॉर्टकट डांबरी रोड नगरपालिका कधी पूर्ण करणार?--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील


     कोपरगाव प्रतिनिधी:----  कोळपेवाडी पेट्रोल पंप सोमारील बाजूस असणारे प्रेम सागर शेजारील जुन्या काळातील अतिक्रमन काढलेल्या वेळी बंद झालेला ,पशु वैदयकीय दवाखाना व स्पान हॉटेल शेजारी असणारे जुने सरकारी धान्यगोडाऊन यामधील  दगड टाकून ठेवलेला,  असणारा नव्याने होणारा डांबरी रोड नगरपालिका कधी पूर्ण करणार. असा सवाल  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला केला आहे, याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,  हा रोड जर लवकर नगरपालिकेने केला तर येवला रोड वर होणारी ट्रॅफिक कमी होऊन साईबाबा कॉर्नर जवळ असणाऱ्या रयत शाळेत जाणारी मुले , वाडांगळे वस्ती जवळील महिला महाविद्यालय ला जाणाऱ्या मुली , तसेच पॉलिटेकनिक, इंजिनीयरींग  कॉलेज ला जाणारे मोठ्या प्रमाणातील कॉलेज चे तरुण मुले मुली , प्राध्यापक ,स्टाफ तसेच  धान्य मार्केट ला जाणारे लोक , शेतकरी , ट्रॅक्टर , ट्रक या रोड चा वापर करू शकतील. तसेच साई बाबा कॉर्नर ला उतरणारे , जाणारे लोक तसेच साई मंदिर ला दर्शना साठी या रोड ने जाऊ यु शकतील. 

येवला नाका रोड क्रॉस करून एस. एस.जीयम ( SSGM collage व शारदा इंग्लिश स्कूल)  कडे वळताना , ओलांडताना ट्रॅफिक जाम होऊन क्रॉस करतांना अपघात ही होतात. कोळपेवाडी पेट्रोल पंप समोरील प्रेमसगर जवळील रोड झाला तर ट्रॅफिक कमी होऊन ,अपघात कमी होतील व पालकांना मुलांची काळजी करणे कमी होईल. मार्केट हून मोठ्या प्रमानामध्ये ट्रॅक्टर व मोठ्या ट्रक ची रेलचेल होत असती. व्यापारी यांना ही हा रोड खूप सोईचा होईल. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळ ही खूप या मुळे वळणा ची लोकांची गडबड होते .ती हा रोड लवकर झाला तर विभागली जाईल.

    हा बस स्टँड रोड( प्रदर्शन गाळे ) ते येवला रोड (प्रेमसांगर स्वीट ) ला जोडणारा नवीन रोड 12 मीटर चा डी.पी.रोड मंजूर झाला आहे असे कळते तर हा रोड जर प्रेमसागर हॉटेल ला खेटून घेतला आणि 18 मीटर केला तर कोळपेवडी पेट्रोल पंप समोर मोठा चौक सर्कल तयार झाला असता व गावाची एक शोभा वाढून नागरिक व मार्केटच्या वाहनांसाठी खूप सोयीचे झाले असते. नगरपालिकेने या रोडसाठी पैसे मंजूर करून टेंडर ही झाले आहे , एक वर्षापूर्वी असे कळते .काम पूर्ण करण्याची मुदत ही संपली असेल. असे कळते .कामाचे फ्लेक्स जर लावले असते तर जनतेला ही कळले असते. तरी हा रोड तात्काळ पूर्ण करावा व आजुन 18 मीटर चा रोड सरकारी धान्य मार्केट यांचे कडून शासन दरबारी नगरपालिका परवानगी घ्यावी. म्हणजे भविष्य काळात मार्केट ची होणार वाढणारी रेलचेल व विद्यार्थी साठी सोयीचे होईल.अशी मागणी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका ला केली आहे

Post a Comment

0 Comments