धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचे हिंदू जनजागृती समितीचे आवाहन.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- घनकचरा, सांडपाणी तसेच केमिकल कंपन्यांकडून वर्षभर नद्यांमधे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असते त्याकडे दुर्लक्ष करून शासन व तथाकथित पर्यावरणवादी मात्र वर्षातुन एकदा होणाऱ्या गणेश विसर्जनास विरोध करुन कृत्रिम तलाव तसेच हौदात गणेश विसर्जनास नागरीकांना भाग पाडत असतात. अनेक ठिकाणी पालिका प्रशासन मुर्ती संकलन करून त्यावर जेसीबी फिरवतात. गणेश मूर्ती कचऱ्याच्या गाडीतून नेण्यात येतात. अशा प्रकारे होणारे श्री गणेश मूर्तीची होणारी विटंबना थांबविण्यासाठी तसेच नैसर्गिक रंग वापरून तयार केलेली व पाण्यात विरघळणारी शाडुच्या मातीच्या मूर्ती वापरण्यासाठी शासनाने नागरीकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समिती कोपरगाव यांच्या वतीने तहसीलदार विजय बोरुडे, कोपरगाव नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडे ३०ऑगष्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या मागणीवर शासनाने विसर्जनाच्या दिवशी योग्य ते नियोजन करून कोणत्याही गणेश मूर्तींची विटंबना अथवा हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन ही शेवटी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी दिलीप सारंगधर, सुनील फंड, सागर बडदे, संतोष गंगवाल, सुशांत खैरे, प्रसाद निकम, मयुर मेहरे आदी उपस्थित होते.
0 Comments