आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

एस. एस. जी. एम. महाविद्यालयाकडून संदीप वर्पे यांचा सत्कार.

 एस. एस. जी. एम. महाविद्यालयाकडून  संदीप वर्पे यांचा सत्कार.



कोपरगाव प्रतिनिधी:-------  येथील श्री  सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झालेबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 दि ३१/०७/२०२२ रोजी सातारा येथे पार पडलेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. संदीप वर्पे हे अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांचे वडील  के. जे. सोमय्या कॉलेजचे माजी प्राचार्य  तर आई एस. एस. जी. एम. कॉलेजच्या माजी प्राध्यापिका आहेत. त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व रयत सेवकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे 



   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या हस्ते मा. संदीप वर्पे यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉ.सानप यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

  सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सुभाष रणधीर, परीक्षा अधिकारी डॉ. देविदास रणधीर, रजिस्टार श्री. सुनील ठोंबरे, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments