मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न.
कोपरगाव प्रतिनिधी:----- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे याहीवर्षी सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने संस्थेच्या सचिव मा.सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
रक्तदान शिबिराचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ज्ञानदेव मांजरे व दिलीपराव चांदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे देखील उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रास्तविक करतांना प्राचार्या डॉ. विजया गुरसळ म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मागील दोन वर्ष कोरोना महामारीचे संकट होते. महाविद्यालयाचे बहुतांश कामकाज ऑनलाईन सुरु असतांना देखील सामाजिक उपक्रम सुरु होते. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना संकटाची तीव्रता बऱ्याचअंशी कमी झाल्यामुळे साहजिकच सर्व निर्बंध शिथिल होवून महाविद्यालयाचे कामकाज देखील नियमितपणे सुरु झाले आहे. मानवी रक्ताची असलेली कमतरता लक्षात घेवून संस्थेचे मार्गदर्शक व चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. नीता पाटील, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये देखील नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य नूर शेख, शिक्षक, हाऊस मास्टर्स, स्काऊट व एन.सी.सी. युनिट आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments