"पोलीस मित्र " म्हणून माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना १५ ऑगस्टला सन्मानपत्र गौरव.
कोपरगाव प्रतिनिधी:----कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ( शिर्डी )संजय जी सातव साहेब यांच्या हस्ते व कोपरगाव चे तहसीलदार विजय जी बोरुडे साहेब , पंचायत समितीचे बिडिओ सूर्यवंशी साहेब , कोपरगाव चे पोलीस निरीक्षक वासुदेव जी दिसले साहेब यांच्या उपस्थितीत , ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्य कोपरगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव गौरव पोलीस मित्राचा या आंतर्गत माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना पोलीस मित्र म्हणून सन्मान करण्यात आला.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व जनता समन्वय सुमधुर ठेवत जनतेच्या रक्षणासाठी व शांतता राहावी या साठी वेगवेगळ्या पध्दतीने , वेळी , पोलीस यांना करत असलेल्या सहकार्या साठी हा सन्मान करण्यात येतो.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे , स्वच्छता दुत सुशांत घोडके , उर्दू शाळेचे रियाज शेख सर , व्यापारी नारायण शेठ अग्रवाल , संजय जगताप , अमित खोकले , सुशांत खैरे व इतर माननीय नागरिक , पत्रकार बांधव व वनिता महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. वंदना चिकटे , सौ.मिनलताई खांबेकर , सौ.जोस्नाताई पगारे , सौ.वैशाली आढाव , सौ जाधव मॅडम व इतर माननीय महिला भगिनी यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी देशभक्ती पर गीत गायनाचा मैफिल " ये वतन तेरे लिये " शारदा संगीत विद्यालय च्या टीव्ही स्टार सुरभी कुलकर्णी यांचा आयोजित करण्यात आला होता. तसेच ठोंबरे साहेब यांनीही गाणे म्हणले. यावेळी लहान मुलाच्या चित्रकला स्पर्धेतील विजयी झालेल्या मुला मुलीचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डीवाएसपी सातव साहेब व तहसीलदार बोरुडे साहेब यांनी कोपरगाव च्या या नुतून पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदा असा आगळा वेगळा समाज हिताचा १५ ऑगस्ट चा कार्यक्रम देसले साहेब यांच्या पुढाकाराने घेण्यात आला व डिव्हिजन मध्ये एक नंबर काम त्यांचा झाला, म्हणून विशेष कौतुक केले.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब , पी. एस.आय. रोहिदास ठोंबरे , पी.एस.आय. भरत दाते , पोलीस खारतोडे व सर्वे पोलीस स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. कोपरगाव करांच्या कायम लक्षत , स्मरणात राहील असा हा आगळावेगळा कार्यक्रम पोलीस स्टेशन ला झाला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ.राजश्री पिंगळे मॅडम यांनी त्यांच्या विशेष शैलीत १५ आगस्ट च्या धर्तीवर कार्यक्रमाची रंगत वाढवत केली.
0 Comments