आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

साहित्यिक, माजी जिल्हाधिकारी ,विश्वास पाटील यांच्या हस्ते माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना "दलित मित्र"पुरस्कार प्रदान.

 साहित्यिक, माजी जिल्हाधिकारी ,विश्वास पाटील यांच्या हस्ते माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना "दलित मित्र"पुरस्कार प्रदान. 

          

कोपरगाव प्रतिनिधी:----- सत्यशोधक आण्णा भाऊ साठेच्या १०२ व्या जयंती कार्यक्रम निमित्त  जेष्ठ साहित्यिक , इतिहासकार , माजी जिल्हाधिकारी " पानीपतकार" विश्वास पाटील यांचे हस्ते माजी नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र ऑयडाॅल  पुरस्कार प्राप्त मंगेश माधवराव पाटील मंगेश पाटील यांना कै.वि.तु.बागुल दलित मित्र पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देखील विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे यामध्ये सौ.वैशाली उल्हारे यांना कै.प्रयागाबाई त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ मुक्ता साळवे शिक्षिका पुरस्काराने,तर कै मच्छीन्द्र राक्षे यांच्या स्मरणार्थ सागर आहेर यांना फकिरा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या  कार्यक्रमास पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे , माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे , अँड.नितीन पोळ , राजेंद्र बागुल  उपस्थित होते. अण्णा भाऊ साठे यांनी संपूर्ण जीवनात संघर्ष अनुभवला आणि आपल्या साहित्यातून रेखाटला असून अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची गाथा आहे असे उद्गार  विश्वास पाटील यांनी व्यक्त केले 

कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

या वेळी मातंग समाजाच्या सामाजिक,राजकीय  क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण करण्यात आले .     

या वेळी बोलताना विश्वास पाटील पुढे म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी जन सामान्यांच्या संघर्षाचे चित्रण आपल्या साहित्यात केले असून साहित्य क्षेत्रा बरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान दिले मात्र ते साहित्य क्षेत्राच्या सर्वोच्च सन्माना पासून वंचित राहिले याची खंत वाटते आपल्या प्रास्ताविक भाषणात अँड. नितीन पोळ यांनी सांगितले की, महापुरुषांच्या शोषण मुक्त समाजकरिता लोक स्वराज्य आंदोलना च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्याना प्रेरणा मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल होते तर आभार सोमनाथ म्हस्के यांनी व्यक्त केले

कार्यक्रमास  शिर्डी चे कमलाकर कोते, सचिन खेडलेकर,पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,शरद त्रिभुवन,निसार शेख,सुजल चंदनशिव,अकबर  शेख, सोमनाथ अहिरे, विनोद वाकळे,प्रवीण शेलार, पी डी सोळसे,अँड. सोनल पोळ,राजेंद्र चंदनशिव, किरण सोळशे,अजय विघे , नितीन डोंगरे , दिलीप कोपरे ,  माजी.नगरसेवक जंगु मरसाळे, संजय पोटे आदी मान्यवर व समाज बांधव  उपस्थित होते. हा पुरस्क।र गावातील बांधवानी दिल्या बद्धल आनंदत् झाला असे पाटील म्हणाले व त्यांनी सर्वांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments