आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सिंधी समाज महिला मंडळ कोपरगाव च्या अध्यक्षपदी सौ.सिमरन खुबाणी.

 सिंधी समाज महिला मंडळ कोपरगाव च्या अध्यक्षपदी सौ.सिमरन खुबाणी.कोपरंगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव शहरातील सामाजीक व धार्मिक  कार्यात सतत अग्रेसर राहणाऱ्या सौ.सिमरन तरुण खुबाणी यांची नुकतीच कोपरगाव शहर सिंधी समाज महिला  मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
     सदरील निवड हि  तीन वर्षांसाठी करण्यात आली.
यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ.नेहा काराचीवाला  यांनी त्यांच्या कारकिर्दीतील तीन वर्षांचा अहवाल सादर केला. तसेच नवीन निवड करण्यात आलेल्या कार्यकारणीला त्यांनी भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.
 नुतन कार्यकारणी उपाध्यक्ष-सौ.वर्षा आर्य
सेक्रेटरी-सौ.गुंजन आर्य
सहसेक्रेटरी-सौ.प्रिया वलीरामाणी
खजिनदार- सौ.दिव्या शर्मा
सह-खजिनदार-सौ.प्रिती राजपाल.
   यावेळी महिला मंडळाच्या संस्थापक सौ.शालिनी खुबाणी व इतर सर्व सहकारी महिला उपस्थिती होत्या.

Post a Comment

0 Comments