शहर पोलीस स्टेशनच्या आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमृत महोत्सवा निमित्त शहर पोलीस स्टेशन कडून १३ ते १६ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची माहिती
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- शहर पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव यांनी दिली आहे शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशन मध्ये शहरातील वेगवेगळ्या शाळेतील 75 मुला मुलींनी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला तसेच या स्पर्धेचा निकाल 15 ऑगस्ट रोजी घोषित केला जाणार असून या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार असून इतर विद्यार्थ्यांना देखील बक्षीसांचे वितरण केले जाणार आहे दरम्यान चित्रकला स्पर्धा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना यंत्र प्राप्ती व राष्ट्रध्वज याबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी मार्गदर्शन केले तसेच या सर्व विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी तसेच पोलीस स्टेशनचा आवर देखील दाखविण्यात आला तसेच मुलांविषयी होणारे सायबर क्राईम वाहतूक नियम व मुलींना त्यांच्या सुरक्षेविषयी मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आले तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले
पोलीस स्टेशनच्या वतीने 13 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षका स्वाती भोर, श्रीरामपूर विभाग, तसेच उपविभागीय अधिकारी शिर्डी विभाग श्री संजय जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आयोजित केली होती यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिकोणे, पोलीस नाईक सचिन शेवाळे ,गोपनीय विभागाचे श्रीराम खारतोडे, पोलीस दिनेश काकडे, प्रिती बनकर, शिक्षक अतुल कोताडे, एस डी गोरे, रवींद्र कांबळे, श्रीमती कावेरी वल्टे, अंजुम खान आदी जण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments