माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते श्री व सौ मंदारजी पहाडे यांच्या हस्ते गुरुशुक्लेश्वर मंदिरात पूजा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी:----- आज वार शुक्रवार दिनांक ५ रोजी गुरू शुक्राचार्य मंदिरात श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार असल्याने विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात आज स्वाती नक्षत्रातील श्रावण शुद्ध अष्टमी असल्याने आजच्या पूजेला विशेष महत्व आहे कारण हा दिवस गुरू शुक्राचार्य महाराज यांचा जन्म दिवस असल्याने आजच्या पूजेला विशेष पाहुणे म्हणून माजी नगर सेवक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री व सौ मंदार जी पहाडे साहेब यांना आमंत्रित करण्यात आले होते. या उभयातांच्या शुभ हस्ते आजची पूजा करण्यात आली .
उभयतांनी आजच्या पूजे साठी आमंत्रित केल्या बद्दल मंदिर प्रशासनाचे आभार व्यक्त केले, त्याच बरोबर मंदिरात येऊन मंदिराचे प्रसन्न व मंगलमय वातावरण या बद्दल समाधान व्यक्त केले . तसेच मंदीराची प्रगती , मंदिराच्या जीर्णोद्धाराचे झालेले अतिशय सुंदर काम या बद्दल भरभरून कौतुक केले.तसेच भविष्यात मंदिर व मंदिर परिसराच्य सर्वांगीण विकासा साठी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्ग दर्शनाखाली मि सदैव प्रयत्न शील राहिल ऐसे प्रतिपादन मंदार पहाड़े यांनी केले मंदिरात आलेल्या भक्तांना मंदिरात मिळणारी सन्मानाची वागणूक व पुजेबध्दल भक्त करत असलेले कौतुक याचाही आवर्जुन उल्लेख त्यांनी केला .
मंदिर प्रशासन ना चे वतीने श्री व सौ मंदार जी पहाडे यांचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी उभयतांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले . या वेळी उपस्थित मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , तसेच मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी, उप मंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे, , विशाल राऊत , संजय वडांगले ,दत्तात्रय सावंत मधुकरजी साखरे, बाळासाहेब लकारे है उपस्तित होते
0 Comments