गुरूपौर्णिमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव - संत निजानंद महाराज.
आत्मा मालिक गुरुपोर्णीमा महोत्सवाची तयारी पूर्ण
कोपरगाव प्रतिनिधी:---- - गुरूपौर्णीमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव आहे. पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरू शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचावा, म्हणनू गुरूची प्रार्थना करावयाची तो दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. भाविकांना ध्यानाचे माध्यमातून प्रत्येकाला त्यांच्या हदयातील परमेश्वराची ओळख करून देण्याचे महान कार्य प. पू. आत्मा मालिक माऊली करत आहे . प्रत्येक भाविकाला प . पू . माऊलींच्या भेटीची ओढ लागलेली असते. गुरूपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर प. पू . माऊलींचे दर्शनभेटीसाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. प्रत्येक मनुष्याच्या हृदयात नांदणारा “आत्मा" हाच परमेश्वर आहे, ही शिकवण माऊलींनी दिली आहे. त्यामुळे येथे आलेल्या प्रत्येक भाविकांचे यथोचित आदरतिथ्य होणे आवश्यक असते . कारण ते प्रत्यक्ष परमेश्वराचे आदरतिथ्य असते, असे प्रतिपादन आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी केले ते गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी बोलतांना ते म्हणाले की ,प . पू आत्मा मालिक माऊलींचे मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे ११ जुलै ते १३ जुले २०२२ दरम्यान “आत्मा मालिक गुरूपौर्णिमा ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या महोत्सवास आवश्यक सर्व तयारी
पूर्ण झाल्याची माहिती यावेळी संत निजानंद महाराज यांनी दिली. यावेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, चंद्रानंद महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त आबासाहेब थोरात, प्रकाश भट, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, बाळासाहेब गोरडे, ओम गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव आव्हाड आदि उपस्थितीत होते.
गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त सत्संगासाठी आत्मा मालिक विद्यासंस्थान इमारतीतील 50000 चौ -फूट हॉल ची व्यवस्था केली आहे . तसेच महाप्रसादासाठी 35000 चौ. फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे . सदर मंडपामध्ये
प्रशस्त व्यासपीठ व्यवस्था ,अद्यावत ध्वनिक्षेपन यंत्रणा तसेच एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांचे सोईसाठी आश्रमचेवतीने महाप्रसाद, स्वागत ,दर्शन ,वाहन व्यवस्था, पादत्राणे,सत्संग,वैदयकीय
सेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा इ . समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या भाविकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत राहून भाविकांची कोठेही गैरसोय होणार नाही ,यासाठी दक्ष राहतील. जवळपास दहा हजार भाविकांची
निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे . त्यामुळे भाविकांना तीन दिवसीय या गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये निवासी
सहभाग घेवून सदगुरू दर्शन ,संतदर्शन व महाप्रसाद लाभ घेणार आहेत .
गुरूपौर्णिमा महोत्सवादरम्यान संत परमानंद महाराज ,संत निजानंद महाराज ,संत विवेकानंद महाराज , संत ग्यानीजी महाराज, संत भगवतीप्रसाद तिवारी, डॉ कल्याणजी गंगवाल, श्री केदारजी सारडा,संत सिध्दनाथ महाराज, ह.भ.प. संत हांडे महाराज ,संत सागरानंद महाराज,संत कबीर महाराज,संत शांतीमाई, संत प्रभावतीमाई, संत स्मृतीमाई व इतर संतगण आत्मप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणार आहे.
0 Comments