आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अंग झटकून कामाला लागा, परिवर्तन नक्की होणार :- ना. आशुतोष काळे.

 अंग झटकून कामाला लागापरिवर्तन नक्की होणार :- ना. आशुतोष काळे.



कोपरगाव प्रतिनिधी:-----  कोपरगाव शहरातील नागरिकांना २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचारा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून वचनपूर्ती केली आहे. अडीच वर्षात कोपरगाव शहरात विकासाच्या बाबतीत झालेल्या बदलाने नागरिक सुखावले आहेत. नागरिकांना विकास अपेक्षित असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे. नगरपालिकेत सत्ता परिवर्तन नक्की होणार असा विश्वास श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत व्यक्त करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

                           कोपरगाव नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्या पार्श्वभूमीवर ना. आशुतोष काळे यांनी कोअर कमिटीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कीअडीच वर्षापूर्वीचे कोपरगाव शहर आणि आजचे कोपरगाव शहर यात विकासाच्या बाबतीत मोठा बदल झाला आहे. शहरातील नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून मागील अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. येत्या दोन वर्षाच्या आत कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळणार आहे. ज्या कोपरगाव शहराला धुळगाव असे संबोधले जायचे त्या कोपरगाव शहराने आपली जुनी ओळख पुसली असून विकासाच्या बाबतीत झालेला बदल भविष्यातील विकासाची नांदी ठरणार आहे.
               शहरातील जनतेला आश्वासन नको होतेत्यांना विकास हवा होता. ती जबाबदारी मी आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली असून यापुढे देखील माझ्याकडून कोपरगाव शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य राहणार आहे. अडीच वर्षाच्या काळात सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेवून संपूर्ण मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणला. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील नागरिकांचा विशेषत: माता-भगिनींचा जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. शहराला दिलेल्या निधीतून नागरिकांना अपेक्षित असलेले रस्तेआरोग्यशहर सुशोभिकरण आदी कामे झाली आहेत.त्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ज्याप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील नागरिकांनी विश्वास दाखविला त्याप्रमाणे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत देखील सुज्ञ जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. २०१९ ला बदल झाला तोच बदल नगरपालिका निवडणुकीत देखील होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे विजय आपलाच होईल असे प्रतिपादन करून ना. आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे.

चौकट :- राज्यातील राजकीय घडामोडी पाहता निवडणूक मागे पुढे होवू शकते किंवा ठरल्याप्रमाणे देखील पार पडू शकते. तरीदेखील कार्यकर्त्यांनी याचा विचार न करता तयारीत राहावे. निवडणुका कधीही होवो आपला विजय मात्र निश्चित आहे.- ना. आशुतोष काळे

Post a Comment

0 Comments