Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी --- ना. आशुतोष काळे

  गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी --- ना. आशुतोष काळे


कोपरगाव प्रतिनिधी:---  मागील दोन दिवसापासून संततधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे व धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाढ होण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी व कोणत्याही प्रकारची संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, हवामान खात्याकडून सोमवार दिनांक ११/७/२२ ते १४/०७/२०२२ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. मागील दोन दिवसापासून सुरु असलेली पावसाची संततधार तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढलेला जोर त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास ५५००० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. रात्रीतून हा विसर्ग ६०,००० क्यूसेकच्यावर जावून त्यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता असून विसर्ग वाढल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी नदी, ओढे, नाले आहेत त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून प्रवास करताना काळजी घ्यावी. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत सुरक्षित स्थळी वास्तव्य करावे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीसाठी आपल्या खाजगी यंत्रणेचे व संपर्क कार्यालयाचे नंबर देखील ना.आशुतोष काळे यांनी प्रसिद्ध केले आहेत.

Post a Comment

0 Comments