आर्ट ऑफ लिविंग कोपरगाव यांच्या वतीने "आनंद अनुभूती" शिबिराचे 20जुलै पासून शिबिराचे आयोजन
तणावमुक्त व आनंदी जीवनाचा मंत्र - जीवन जगण्याची कला
तनावमुक व आनंदी कोपरगावासाठी आर्ट ऑफ लिविंग चे प्रयत्न.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-----
आपण जीवनामध्ये खूप काही शिकलो, समझलो पण 24 तास आपल्या सोबत राहणाऱ्या मनाबद्दल आपल्याला फार कमी माहित असतं...या मनाला कसं सांभाळायच? हे मात्र कुणी शिकवल नाही आणि म्हणून आपले मन तणावात अडकून जाते व आपण जीवनाचा परिपूर्ण आनंद आपण घेऊ शकत नाही..
जर आपण आपल्या मनाला तणाव मुक्त करायला शिकलो तर जीवन आनंदाने भरून जाईल!
आर्ट ऑफ लिविंग कोपरगाव व लायन्स आणि लीओ क्लब कोपरगाव यांनी - या विषयात एक पाउल उचलले आहे! कोपरगाव-करांना तणावमुक्त करण्यासाठी आणि आनंदाने भरण्यासाठी आयोजित केले आहे - "आनंद अनुभूति शिबिर"
आनंद अनुभूति शिबिर - 20 ते 24 जुलाई, महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे होणार आहे. सकाळची बॅच (6 - 8:30) व संध्याकाळची बॅच (5:30 - 8 )आहे.
नाव नोंदणी साठी संपर्क : डॉ अंकित कृष्णानी 9823419099, राणीताई रोडे 9970061445, सारिकाताई भूतडा 9503133179
या शिबिराचे मुख्य घटक -सुदर्शन क्रिया ही श्वसन प्रक्रिया आहे.
सुदर्शन क्रिया ही मनाला तणाव मुक्त करणारी , शरीरात व मनात उर्जेचा संचार करणारी - जगविख्यात श्वसन प्रक्रिया आहे... श्वासावर आधारित ही प्रक्रिया करुन जगभरातील लोकांनी शांत मन व गहन ध्यानाचा अनुभव घेतला आहे.
सुदर्शन क्रियेवर झालेले शंशोधन वाचा : aolresearch.org
सुदर्शन क्रिया ही गुरुदेव श्री श्री रविशंकर जी द्वारा समजाला दिलेली एक अमूल्य भेट आहे.
कोपरगावातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ व आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक डॉ अंकित कृष्णानी यांनी शिबिराची माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरात भाग घेण्यासाठी आवाहन केले आहे.
0 Comments