प्रवास करताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून आज्ञात चोरट्याचा पोबारा, गुन्हा दाखल.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----
प्रवास करत असताना वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी करून पोबारा केल्याची घटना घडली आहे बाबत थोडक्यात माहिती अशी की तालुक्यातील माळेगाव थडी येथील महिला श्रीमती विमलबाई आप्पासाहेब शिंदे वय ७० वर्ष या कोपरगाव चास हांडेवाडी या बस मधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना गुरुवार दिनांक ७ रोजी दुपारी ३:१५ वाजेच्या कोपरगाव ते टाकळी फाटा दरम्यान घडली असून याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक ए.एम. दारकुंडे हे करत आहे
दरम्यान कोपरगाव बस स्थानक परिसरात पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून या ठिकाणी अनेक भुरटे चोर तसेच महिला चोर देखील फिरत असल्याचे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून बोलले जात आहे त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी देखील नागरिकांसह प्रवाशांमधून होत आहे.
0 Comments