Yogesh

Yogesh

आदर्श उपक्रम, सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप.

 आदर्श उपक्रम, सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप.कोपरगाव प्रतिनिधी:----  सालाबादप्रमाणे याही वर्षी सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडून १६ जून रोजी  नगरपालिका शाळा क्रमांक ३ या मुलींच्या शाळेत ३० गरजू मुलींना शाळेसाठी चांगल्या प्रतिच्या बॅगचे वाटप करण्यात आले.  संस्थेकडून फेब्रुवारी महिन्यात गरजू महिलांना साड्यांचे वाटप व मार्च महिन्यात शालेय मुलांना खाऊचे वाटप व गार पाण्याचे जार यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सनातनच्या साधिका सौ. लिलावती जमधडे, श्रीमती कल्पना सोनवणे या उपस्थित होत्या. शाळा नंबर ३ च्या मुख्याध्यापिका शोभा गाडेकर व शिक्षिका सरस्वती कानडे यांच्या हस्ते बॅगचे वाटप करण्यात आले. सनातन भारतीय संस्कृती संस्था करत असलेल्या कार्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments