आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर धंद्याना आळा घालावा. - अँड.नितीन पोळ

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर धंद्याना आळा घालावा. - अँड.नितीन पोळ


कोपरगाव प्रतिनिधी ---

राज्यात राजकीय वातावरण अस्थिर असले तरी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुक्यातील बेकायदेशीर धंद्याना आळा घालावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे 

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले कोपरगाव शहर व तालुक्यात बेकायदेशीर दारू, मटका जुगार आदी व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून देखील शहरात हे व्यवसाय जोमाने सुरू आहेत बेकायदेशीर दारू वाहतुकी बरोबरच छुप्या पद्धतीने गांजा,चरस यांची देखील विक्री केली जात असून या व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद असल्याने या बेकडेशिर व्यवसाय करणारांची मुजोरी वाढली आहे त्यातून तालुक्यात रोज कुठेना कुठे अनुचित प्रकार घडत आहेत

सद्या राज्यात राजकीय वातावरण अस्थिर आहे मात्र नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे कोपरगाव तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणुका लागल्या असून गावोगाव राजकीय वातावरण तापले आहे त्यातच बेकायदेशी दारू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांकडून थेट गावखेड्यात दारू पोहच केली जात आहे तालुक्यातील अनेक गावे गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंनी वसलेली असून या भागात वाळू वाहतूक करण्यासाठी तालुक्यातील लोकांबरोबरच बाहेरून अनेक वाळू तस्कर येत असतात त्यांना देखील थेट नदी पात्रात दारू गांजा चरस पोहच केले जाते वाळू व्हातुक्याच्या कारणावरून अनेकदा या परिसरात छोट्या मोठ्या चकमकी घडल्या आहेत तर अनेकदा पोलीस व महसुल अधिकारी यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेले आहे 

सद्या निवडणुकीचे वातावरण तापले असून अनेकदा दोन्ही राजकीय गटात लहान मोठे वाद होतात मात्र गावोगाव दारू पोहच होत असल्याने या वादात भर पडत आहे मागील काही महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक यांनी दारू जुगार व मटका व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पथक नेमणार अशी घोषणा केली होती त्यामुळे बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री करणारे तसेच जुगार मटका चालवणारांचे धाबे दणाणले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर झाल्याने दारू विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहे मात्र त्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न जटिल होऊ शकतो पोलीस देखील या दारू गांजा वाहतूक करणारांना राजरोसपणे सहकार्य करत असतात मात्र यातून खूप मोठा अनर्थ घडल्यावर पोलिसांना जाग येणार आहे का? पोलीस अनर्थ घडण्याची वाट पहात आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दारू जुगार मटका व्यवसायिकांवर कारवाई करून भागणार नाही पोलिसाना या बेकायदेशीर व्यवसाय करणारांची  माहिती आहे आणि नसेल तरी महिला भगिनी यांना होणारा त्रास पहाता व अनर्थ घडू नये म्हणून  तालुक्यातील निवडणुकीचे  वातावरण पहाता या व्यासायिकांना जिल्ह्याबाहेर तडीपार करावे अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

Post a Comment

0 Comments