आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सामाजिक कामात अग्रेसर असणारे ॲड. योगेश खालकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साज

सामाजिक कामात अग्रेसर असणारे ॲड. योगेश खालकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.


 कोपरगाव प्रतिनिधी :---  वकिली व्यवसाय व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सातत्याने पाठपुरवठा करून वेळ प्रसंगी आंदोलन करणारे सुप्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्ते ॲड. योगेश खालकर यांचा वाढदिवस रांजणगाव देशमुख व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी साजरा केला.  ॲड. योगेश साहेबराव खालकर व्यवसायाने वकील असले तरी त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने त्यांनी आजवर अनेक रस्त्याच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात तसेच वृक्षारोपण आदींसह विविध सामाजिक उपक्रम आजवर राबविले आहेत. आपला वकिली व्यवसाय करत असताना देखील त्यांनी सर्व समाजातील नागरिकांना न्याय देण्याच्या हेतूने सातत्याने प्रयत्न केले आहेत.  योगेश साहेबराव खालकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोपरगाव वकील संघाच्या वतीने देखील ॲड. खालकर यांना सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच रांजणगाव ग्रामस्थांच्या वतीने देखील ॲड. खालकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी अँडव्होकेट गंगावणे,अँडव्होकेट आतिष आगवण, रमेश गव्हाणे ॲड. राहुल वाघचौरे, ॲड. रमेश दुशिंग त्याचप्रमाणे राजेंद्र सुरासे अनिल वर्पे, सुनील वर्पे, सोमनाथ वर्पे, सोमनाथ गडाख, सोमनाथ खालकर, गजानन सरोदे, मयूर खालकर काटे,खालकर, आदींसह वकील व ग्रामस्थ मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments