अल्पवयीन मुलाच्या हत्यारास जन्मठेपेची शिक्षा झाल्याने मुलाच्या कुटुंबास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेमुळे मिळाला न्याय.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी---
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन चे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस पकडत योग्य तो तपास करून त्या गुन्ह्याचा छडा लावत न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.त्याची दखल घेत नुकताच निफाड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी.वाघमारे यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असुन हे सर्व तत्कालीन पोलिस निरीक्षक देसले यांनी योग्यरीत्या तपास केल्याने व मा सरकारी वकील यांनी योग्य बाजू मांडली यामुळे शक्य झाले असून ,या मुळे अल्पवयीन मुलाच्या कुटुंबास न्याय मिळाला असल्याची भावना जनमानसात व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा भागातील लुकमन गणी पिंजारी यांचा ६ वर्षाचा मुलगा साहिल याचे दि २५ जून २०१७ रोजी अपहरण करून साहिलच्या तोंडावर गादी ठेवून तोंड दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेचा पोलीस निरीक्षक देसले यांनी अधिक तपास करत हा खून पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा भागातील भिकन नाजीर पिंजारी याने केला तर या साठी भिकनची आई अमिनाबी नजीर पिंजारी हिने मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३६३ व ३०२ अन्वये निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते त्या खटल्याचा अंतिम निकाल नुकताच कोर्टाने सुनावला असून त्यात मुख्य आरोपीची आई अमीनाबी ही वयोवृद्ध असल्याने तिची मुक्तता करण्यात आली तर आरोपी भिकन यास साहिलचे अपहरण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार ५ वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली तर खुनाच्या गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम ३०२ नुसार जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्या ने तत्कालीन पोलिस निरीक्षक व तपासी अधिकारी वासुदेव देसले यांनी योग्य रित्या तपास करत अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्या गुन्हेगाराचा छडा लावल्याने आरोपीस जन्मठेप मिळाली असून जणू यांमुळे साहिल च्या कुटुंबास न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पिंपळगाव बसवंत चे तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे सध्या कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून या गुन्ह्याबाबत त्यांनी अधिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, सर्वात महत्वाचे म्हणजे आरोपी हा फिर्यदीचा नातेवाईक होता. या गुन्ह्यातिल साक्षीदार हे फितूर झाले होते तर काही साक्षीला आलेच नाहीत तसेच कोणीही प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार नाही. आरोपीने गुन्ह्यात कोणतेही हत्यार वापरले नाही.त्यामुळे हा तपास लावणे व कोर्टात गुन्हा सिद्ध करणे खूप जिकरीचे काम होते.आरोपीला परिस्थिती जन्य पुराव्या वरून सखोल शास्त्रीय पद्धतीने तपास करत ,तसेच गंभीर जखमीआरोपीस दोन महिने कडकं सुरक्षा बंदोबस्तात नाशिक व मुंबई येथील रुग्णालयात उपचार करून ताब्यात घेतले होते.त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचविणे हे अत्यंत कठीण असे काम होते आणि ते कंठीण काम तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यानी केले . साहिलच्या कुटूंबाला न्याय मिळाल्याने तपासी अधिकारी यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे.सध्या कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले वासुदेव देसले यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments