बहिऱ्या शासनाला जाग आणण्यासाठी शासनाच्या कानाजवळ भोंगे लावणे योग्य.
------- विजय वहाडणे
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी:----- सध्या संपूर्ण देशभर भोंगे हाच विषय गाजतो आहे. मनसे प्रमुख श्री.राज ठाकरे साहेबांनी अवैध भोंगे त्वरित हटवून ध्वनिप्रदूषण थांबवावे अशी मागणी केली. मस्जिदी, मंदिरे, मदरसे इ. धार्मिक स्थानांवरून भोंगे हटवावेत कि नाही? यावरून मोठाच गदारोळ सुरू आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा.योगीजी यांना व्यवस्थित ऐकू येत असल्याने त्यांनी या गदारोळाची दखल घेऊन मोठ्या प्रमाणांत अवैध-विना परवाना भोंगे-लाऊडस्पीकर काढून टाकण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. पण महाराष्ट्र शासन बहिरे असल्याने त्यांना जनभावना ऐकू आलेल्या नसाव्यात. बहिऱ्या शासनाला नीट ऐकू जावे यासाठी आता मंत्रालय- मंत्र्यांचे बंगले-जिल्हाधिकारी कार्यालय-तहसील कचेऱ्यांसमोर मोठ्या आवाजात भोंगे लावण्याची वेळ आलेली आहे जळजळीत टीका माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,
मस्जिदीसमोर भोंगे लावून सर्वसमान्य हिंदु मुस्लिमांत तणाव निर्माण करण्यापेक्षा बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी शासनाच्या कानाजवळच भोंगे लावणे योग्य होईल असे वाटते. खरे तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात सुद्धा भोंगे हटविलेच पाहिजेत असेच असणार. कारण, स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेवर आलो तर भोंगे त्वरित हटविण्याचे आधीच जाहीर केलेच होते. पण मतांसाठी लाचारी करणारे शासनातील सहकारी पक्ष मुख्यमंत्र्यांना भोंगे काढू देणार नाहीत. एकदा कोपरगावात स्व.बाळासाहेब ठाकरेंची सभा चालू असतांनाच भर दुपारी भोंग्यावरून अजान ऐकू
आली त्यावेळेसच त्यांनी भोंग्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. हे निष्ठावंत शिवसैनिकांना आजही आठवणीत असणार असल्याचे शेवटी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हंटले आहे.
0 Comments