कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारणीच्या
ना.आशुतोष काळेंच्या मागणीलाई उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
कोपरगांव प्रतिनिधी:----- संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बस स्थानकाच्या सभोवताली ज्याप्रमाणे व्यापारी संकुल उभारण्यात आली आहेत त्या धर्तीवर नूतन कोपरगाव बस स्थानकाच्या चहूबाजूंनी व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा या श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.
उपमुख्यमंत्री पवार हे बुधवार (दि.६) रोजी कोपरगाव मध्ये विविध विकास कामाचे लोकार्पण तसेच पंचायत समिती प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते यावेळी आयोजित जाहीर सभेत नामदार आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या विस्थापित झालेल्या व्यावसायिकांसाठी बीओटी तत्वावर कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी परिवहन खात्याकडे प्रस्ताव पाठविलेला आहे तसेच शासकीय मोकळ्या जागेवर देखील व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली होती.
त्या मागणीचा धागा पकडत उपमुख्यमंत्र्यांनी कोपरगाव मतदार संघाला विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला. त्याचबरोबर बीओटी तत्वावर बस स्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी परिवहन मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. बस स्थानकात बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामूळे आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार कोपरगाव बस स्थानकात बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी देण्याची ग्वाही देऊन कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. तसेच इतरही विकास कामाचे प्रस्ताव तयार करून पाठवा त्या प्रस्तावांना मी तातडीने मंजुरी देईल असा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी ना.आशुतोष काळे यांना दिला आहे.त्यामुळे बस स्थानकात लवकरच व्यापारी संकुल उभारले जाऊन विस्थापित झालेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे
0 Comments