Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

शहराच्या विकासाला कितीही अडथळे आले तरी कोपरगावकरांच्या आशीर्वादाने कोपरगावचा कायापालट करून दाखवीन – ना. आशुतोष काळे

 शहराच्या विकासाला कितीही अडथळे आले तरी

कोपरगावकरांच्या आशीर्वादाने कोपरगावचा कायापालट करून दाखवीन – ना. आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था योजनेला तांत्रिक मंजुरी ऑक्टोबर महिन्यातच मिळाली होती व प्रशासकीय मंजुरी देखील तातडीने मिळाली असती मात्र चांगल्या कामांना खोडा घालणाऱ्या वृत्तींमुळे काहीसा विलंब झाला असला तरी कोपरगावकरांचे आशिर्वाद माझ्यामागे खंबीरपने होते म्हणून हे काम होवू शकले. यापुढे देखील कोपरगाव शहराच्या विकास कामांना अडथळे येतील, मात्र असे कितीही अडथळे आले तरी कोपरगावकरांच्या आशीर्वादाने कोपरगावचा कायापालट करून दाखवीन अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वत मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्था कामासाठी १३१.२४ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल आज कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सूरु आहेत. त्याचाच एक भाग कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून १३१.२४ कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून श्री साईबाबा संस्थान, शिर्डी तसेच कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी विकासकामे करणार असल्याची ग्वाही दिली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे सर्वांच्या वतीने शहर विकासाचे चांगले काम करून दाखवू असा विश्वास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायास ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वाहतुक सेनेचे प्रमुख व कोपरगाव संपर्कप्रमुख उदयन दळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुमित साळुंके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.सपना मोरे, राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस रेखा जगताप, विद्यार्थी शहराध्यक्ष निखील डांगे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्ष मुकुंद सिनगर, युवासेना विस्तारक सुनील तिवारी, वाहतूकसेना जिल्हाध्यक्ष इरफान शेख, किसान काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरवके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजिज शेख, नगरसेविका वर्षा शिंगाडे, शहरप्रमुख राखी विसपुते, उपशहरप्रमुख आश्विनी होन, युवती सेनेच्या अक्षीता आमले, एस.टी. कामगार सेनेचे किरण बिडवे, अरुण वाणी, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, डॉ. आतिष काळे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शेखर कोलते, उपाध्यक्ष दत्तू पगारे, प्रफुल्ल शिंगाडे, योगेश उशीर, विकास शर्मा, सुनील कुंढारे, मयूर दळवी, राकेश वाघ, अमजद शेख, अविनाश धोक्रट, किरण कुटे, जाफर सय्यद, राहुल देशपांडे, अविनाश वाघ, रवींद्र सोनवणे, बाळासाहेब साळुंके, वैभव गिते, श्रीरंग चांदगुडे, वसीम शेख, विजय सोनवणे, आकाश डागा, संदीप सावतडकर, ऋषीकेश खैरनार, नारायण लांडगे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments