आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

फक्त प्रश्न नव्हे तर उत्तराचा देखील जनता दरबार - ना. आशुतोष काळे

 फक्त प्रश्न नव्हे तर उत्तराचा देखील जनता दरबार - ना. आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:--- मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यालयात अडकलेली कामे लवकरात कसे मार्गी लागतील यासाठी जनता दरबार घेत आहे. त्यामाध्यमातून अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहे त्यामुळे फक्त प्रश्न नव्हे तर या प्रश्नाची उत्तरे देखील या जनता दरबारात नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे फक्त प्रश्नच नव्हे तर उत्तराचा देखील जनता दरबार होत आहे याचे काहीसे समाधान असले तरी अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत हे प्रश्न पुढील जनता दरबारात येणार नाही याची काळजी सबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल अशा शब्दात ना.आशुतोष काळेंनी कामचुकार अधिकाऱ्यांचे कान टोचले.

 मतदार संघातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील अडलेली कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी शासकीय अधिकारी व नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून जनता दरबार घेत आहेत. या जनता दरबारात नागरिकांना आपल्या अडचणी बिनदिक्कतपणे मांडता येत आहेत. त्या प्रश्नांवर या जनतां दरबारात मार्ग निघून आजवर अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्याबाबत ना. आशुतोष काळे स्वत: सबंधित अधिकाऱ्याकडे विचारणा करीत असल्यामुळे नागरिकांसाठी जनता दरबार आशेचा किरण ठरत आहे.

 सोमवार (दि.११) रोजी ना.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, रेल्वे विभाग, सहाय्यक निबंधक विभाग, दुय्यम निबंधक विभाग, वन विभाग, कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, सामाजिक वनीकरण, वखार महामंडळ आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत.तहसील कार्यालयात घेतलेल्या जनता दरबार घेतला. तत्पूर्वी मागील जनता दरबारात नागरिकांनी मांडलेले किती प्रश्न मार्गी लागले याबाबत सबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केला अशा कामचुकार अधिकाऱ्यांचे त्यांनी कान देखील टोचले.

           यावेळी पुढे बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सकारात्मक द्यावेत. यापूर्वी घेतलेल्या जनता दरबारात व आजच्या दरबारात बरेच प्रश्न सुटलेले नाहीत. याचा अर्थ अधिकारी योग्य पद्धतीने काम करीत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे त्यासाठी अधिकाऱ्यांनी यापुढील काळात नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घेवून पुढील जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत अशा प्रकारे काम करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे खडेबोल सुनावत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले.

           याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक ज्ञानदेव मांजरे, कारभारी आगवण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, नंदकुमार औताडे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र खिलारी, शफीक शेख, राजेंद्र खैरनार, विकी जोशी, मुकुंद इंगळे, भाऊसाहेब भाबड, जुनेद शेख, मयूर राऊत, शफीक शेख, हरीभाऊ केकाण, रितेश राऊत, राजेंद्र आभाळे, नायब तहसीलदार श्रीमती कुलकर्णी, श्रीमती गोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता भगवंत खराटे आदींसह शासकीय अधिकारी

Post a Comment

0 Comments