मतदार संघातील नागरिकांचा सदैव ऋणी राहील –ना.आशुतोष काळे
जनतेच्या आशीर्वादाने ५ नं. साठवण तलावासाठी १३१ कोटी रुपये मिळाले –ना. आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी निवडून देऊन मला विधिमंडळात पाठवले. त्यामुळेच मला साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो त्याबद्दल मी मतदार संघातील नागरिकांचा सदैव ऋणी राहील असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव येथे श्रीरामनवमी निमित्त बालाजी कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगावमध्ये मागील अनेक वर्षापासून दरवर्षी रामनवमीला कोपरगाव ते शिर्डी पायी पदयात्रा आयोजित करून साई पालखी शिर्डीला जात असे. मात्र मार्च २०२० पासून कोरोनाच्या वैश्विक संकटाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मागील दोन वर्षापासून कोपरगावकरांना साई पालखी नेता आली नाही. परंतु मागील काही महिन्यांपासून साईबाबांच्या कृपेने कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे निर्बंध काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा साई पालखी कोपरगाववरून शिर्डीला जात आहे. याचा विशेष आनंद वाटत आहे. कोरोना काळात रुग्णांची केलेली सेवा व आपणा सर्वांच्या आशीर्वादाने श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मला दिली आहे. त्या माध्यमातून शिर्डी तसेच कोपरगावकरांसाठी देखील विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. जनतेच्या आशीर्वादाने ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे कोपरगाव शहराचा मागील अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न सोडविण्यात यश मिळाले याचे समाधान वाटते. साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरूण मंडळाने साईबाबा कॉर्नर येथे भव्य कमान उभारण्याचे व कार्डियाक हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली आहे. त्या मागणीचा विचार करून विश्वस्त मंडळ निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन ना.आशुतोष काळे यांनी यावेळी दिले.
यावेळी मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड, संतोष चव्हाण, संजय काळे, संजय जगताप, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, जिनिंग प्रेसिंचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, निलेश साबळे, सचिन गवारे, महेश उदावंत, नारायण लांडगे, मुकुंद इंगळे, ऋषीकेश खैरनार, मनोज नरोडे, विकि जोशी, विलास आव्हाड, सागर लकारे, गणेश लकारे, राजेंद्र जोशी, राजेंद्र देवरे, पुंडलिक वायखिंडे, निलेश पाखरे, नितीन गुंजाळ, रोहित खडांगळे, अमोल देवकर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments