आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अडीच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी १००० कोटी निधी आणला – ना. आशुतोष काळे

 अडीच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी

१००० कोटी निधी आणला – ना. आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासकामांसाठी अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून १००० कोटीचा निधी आणला असल्याची माहिती श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी मतदार संघाच्या विकासाची मोठी आव्हान होती. रस्त्यांची दुरावस्था झाली होती. राज्य मार्ग, ग्रामिण मार्ग असेल, इतर जिल्हा मार्ग असतील वाड्या-वस्त्यावरील रस्ते असतील यांची अक्षरशः चाळण होवून हे रस्ते नागरिकांसाठी जीवघेणे ठरत होते. कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता. वीजेच्या समस्या होत्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न देखील प्रलंबित होता. अशी अनेक आव्हाने असतांना जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. दोन वर्षाचा काळ जरी कोरोना संकटाशी दोन हात करण्यात गेला असला तरी मतदार संघाला कधीही विकासापासून दूर जावू न देता तेव्हापासून आजतागायत मतदार संघाच्या विकासासाठी तब्बल १००० कोटी रुपयांचा निधी आणला आहे.



यामध्ये अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या एन.एच. जी ७५२ या महामार्गाच्या हस्तांतरणासाठी पाठपुरावा करून या मार्गावरील सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्यासाठी १७८ कोटी निधी आणला आहे. कोपरगाव शहराचा अत्यंत भीषण  झालेला पाणी प्रश्न  सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून केलेल्या पाठपुराव्यातून या साठवण तलावाला नुकतीच १३१.२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी महाविकास आघाडी सरकारने आणली आहे. काकडी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटी, मतदार संघातील रस्त्यांसाठी १४० कोटी रुपये निधी मिळविला. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी ९५ कोटी, ११५ वर्ष आयुर्मान झालेल्या गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी देखील ३०० कोटीची मंजुरी मिळविली असून पैकी ५५ कोटी निधी मिळाला आहे. मोडकळीस आलेल्या शासकीय इमारतीसाठी ९५ कोटी, मतदार संघातील विविध पुलांसाठी २२ कोटी निधी आणला असून अस्मानी संकटाच्या नुकसानीपोटी मदत पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन कडून ४५ कोटी मदत मिळवून दिली आहे. मतदार संघातील अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून ३.२० कोटी निधी मिळविला आहे. दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ०२ कोटी. तांडा सुधार योजने अंतर्गत ०१ कोटी, कोपरगाव नगरपरिषद इमारत ०२ कोटी,स्मशानभूमी कब्रस्थान समाज मंदिर साठी १३ कोटी आणि दलित वस्ती साठी २.३१ कोटी व मतदार संघातील इतर विकासकामांसाठी ६६ कोटी अशा प्रकारे अडीच वर्षाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवळपास १००० कोटी निधी मतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आणला आहे. भविष्यात देखील मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून उर्वरित विकासकामांचा निपटारा करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक गावांत स्मशानभूमी, पाणी योजना व वीज व्यवस्था करण्याचा संकल्प, मंजूर बंधाऱ्याचे कायमस्वरूपी नुतनीकरण, सबजेल व मुलांचे व मुलींचे वस्तीगृह उभारणे, आदिवासी भवन उभारणे, कोपरगांव शहरातील नदी संवर्धन योजने अंतर्गत घाट सुशोभीकरण करणे, नवीन सब स्टेशन व रोहीत्रांची क्षमता वाढ करणे, महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी बचतगटांना बळकटी देणे, माजी सैनिक भवनउभारणे आदी महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असून कोपरगाव बस स्थानक येथे व्यापारी संकुलासाठी व शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे साठी पाठपुरावा सुरु असून कोपरगांव रेल्वे स्थानकाला मध्यवर्ती रेल्वे स्थानक मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.२०२४ पर्यंत जास्तीत जास्त विकासकामे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी

Post a Comment

0 Comments