आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आईला खांद्यावर घेऊन पायी घेवून जाणारे श्रावणबाळ बबनराव जोगदंड यांचे विचार अंतर्मुख करायला लावणारे.--- माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील

 आईला खांद्यावर घेऊन पायी घेवून जाणारे श्रावणबाळ बबनराव जोगदंड यांचे विचार अंतर्मुख करायला लावणारे.---

माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील



कोपरगाव प्रतिनिधी:-----  श्री रामनवमी निमित्ताने कोपरगावातुन हजारो साईभक्त शिर्डीला पाई जातात. कोपरगाव येथील सर्वसामान्य रिक्षाचालक बबन तुळशीराम जोगदंड यांनी त्यांचे वयाचे ७१ व्या वर्षी आपल्या १०५ वर्षाच्या आईला(जयाबाई) खांद्यावर घेत पायी कोपरगाव ते शिर्डी श्री साईबाबाची यात्रा घडवली आहे.भौतिक साधनांची सुबत्ता असतांनाही आपापल्या पद्धतीने अध्यात्मिक सुखाचा शोध घेत सदैव बेचैन असणार्या सर्वांनाच बबनराव यांची आई प्रेमापोटी केलेली कृती अंतर्मुख करायला लावत असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी केले.

कोपरगावहून शिर्डीला आईला खांद्यावर घेऊन पायी जाणारे बबनराव जोगदंड आणि त्यांची आई जयाबाई यांची माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,युवा सामाजिक कार्यकर्ते प्रणव वाणी, छायाचित्रकार शंतनु गुळस्कर यांनी भेट घेतली.या प्रसंगी त्यांचा शाल,हार,पेढे देऊन त्यांचा सन्मान करत दर्शन घेतले.

सध्या कोपरगावसह महाराष्ट्रातील अनेकांच्या फेसबुकवर,स्टेट्सला आईला खांद्यावर घेऊन कोपरगाव ते शिर्डी पायी घेवून जाणारा श्रावणबाळचा व्हिडिओ गाजतोय. या पार्श्वभूमीवर जोगदंड परिवाराची भेट घेऊन आई आणि मुलाचा सन्मान केला आहे.

बबनराव जोगदंड यांनी आत्तापर्यंत १८ वेळेस पंढरपूरच्या विठोबाची वारी केली आहे.४५ वर्ष झाले ते रिक्षा चालवतात.कोविड काळात नितीमत्ता ढळू न देता अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालविला.मेरठच्या मुळ रहिवासी असलेल्या एअर पोर्टच्या उच्चपदस्थ महिला अधिकारी ह्या अमेरिका दिल्ली असतात.त्यांनी अडीअडचणीला केलेल्या मदतीमुळे जोगदंड बोलतांना भावूक होतात.

आईला पायी घेवून जाण्याचा विचार कसा आला? असे श्री.बबनराव जोगदंड यांना विचारले असता... अगदी सुरुवातीपासून पासून मुंबादेवीच्या साईगांव पालखीला पायी जात असतो...आईला एकदा घेवून जावे असा विचार दरवर्षी यायचा...पण या वर्षी ईच्छा पुर्ण झाली. कोपरगाव शहरातील बिरोबा चौकात मृत्युंजय गणेश आणि मुंजोबा मंदिर आहे.येथे बबनराव जोगदंड नित्य दर्शनासाठी येतात.याच मंदिरात दक्षिणमुखी असलेली पंचधातुची पर्वत उचललेली मुर्ती आहे.नेहमी प्रमाणे आजही रामनवमीला सकाळी दर्शनासाठी आलो.बजरंगबलीने एका हातात पर्वत उचललेला पाहून मुर्तीकडे पहात "तुम्ही डोंगर घेवून जावू शकतात मग आईला मी जावू शकत नाही का..."असे म्हणून नमस्कार करताच तेव्हड्यात फुल डोक्यावर पडलं...मग अंगात बारा हत्तीचे बळ संचारले सारखे वाटून आईला शिर्डीला घेऊन जायचेच असा निर्धार करून पुर्णत्वास नेला... 

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात सर्वसामान्य परिस्थितीत रिक्षाचालक बबनराव जोगदंड राहतात.घरची परिस्थिती अतिशय बेताची संसाराचा गाडा हाकताना त्यांच्या पत्नी सौ.सुमनबाई भाजीपाला विकून हातभार लावतात.मुर्शतपूर फाट्यावरुन हिंगणी कडे जातांना साधारण शंभर मिटर अंतरावर साधे पत्र्याचे शेड जोगदंड परिवाराचे आहे.घरा प्रवेश करतांना पत्र्यावर सोडलेला गारवेल उष्णतेपासून कमालीचा थंडावा देतो.परसातच केळीची खुंट आणि ईतर फुलझाडांची पंगत पहावयास मिळते.घरात प्रवेश केल्यावर देवदेवतांच्या फोटोंची रांग पहावयास मिळते.प्रसन्न वातावरण वाटते.आपली संस्कृती गरीब -जनसामान्यांनीच टिकवली असल्याचा विश्वास दृढ होतो...

Post a Comment

0 Comments