लक्ष्मी आई यात्रा निमित्ताने शहरात ५ दिवस उत्सव समिती कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी--- कोपरगाव शहरातील बाजार तळ येथील जागृत देवस्थान असलेल्या जय लक्ष्मी आई यात्रा उत्सव गुरवारी २८ एप्रिल पासून सुरू होत असून २मे या कालावधीत होत आहे. त्यानिमित्ताने समितीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गुरुवार २८ रोजी स्वर माधुर्य आर्केस्ट्रा, शुक्रवार २९ रोजी प्रसिद्ध डॉक्टर गौरव वर्मा हृदय रोग तज्ञ, डॉक्टर संदीप बोरले अस्थिरोग तज्ञ प्रमुख म्हणून या मोफत तपासणी शिबिरात असणार आहे, त्याचप्रमाणे शुक्रवार संध्याकाळी ७वाजता लावणी महोत्सव, शनिवार ३० रोजी सायंकाळी ५ वा. मिरवणूक व दारुगोळा रविवार १मे रोजी दुपारी २वा. कुस्त्यांचा हंगामा, सोमवार २रोजी सकाळी १०वा. बैलगाडा शर्यत, व महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा सर्व कोपरगाव वासियांनी लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन जय लक्ष्मी आई यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे
0 Comments