आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा ५ कोटी निधी मंजूर – ना.आशुतोष काळे

 

कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी

पुन्हा ५ कोटी निधी मंजूर – ना.आशुतोष काळे



कोपरगांव प्रतिनिधी:---- -कोपरगाव विधान मतदार संघाच्या ग्रामीण भागातील नागरिकाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी शासनदरबारी प्रस्ताव दाखल केले होते. त्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री.साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.


कोपरगाव मतदार संघाचा विकास साधण्यासाठी रस्ते विकास अत्यंत महत्वाचा होता.रस्त्यांची झालेली दूरावस्था बदलण्यासाठी या रस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळविणे मोठे आव्हान होते.परंतु रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने अडीच वर्षात अडचणीच्या काळात देखील मतदार संघातील रस्त्यांसाठी १४० कोटी रुपये निधी मिळविला आहे आणि अनेक रस्त्यांना निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी दिला असून आजपर्यंत १४५ कोटी निधी रस्त्यांसाठी मिळाला आहे.



 मिळालेल्या ५ कोटी निधीतून मतदार संघातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.यामध्ये कारवाडी वडाची वाडी भास्करराव गायके वस्ती ते मारुती मंदिर,संदीप भोसले घर ते नानासाहेब तनपुरे वस्ती,मंजूर रा.मा.७ ते हंडेवाडी दादासाहेब गावंड वस्ती,नारायण गावंड वस्ती ते दादासाहेब मोरे वस्ती,दौलत मोरे वस्ती ते विठ्ठलराव तिरसे वस्ती,मारुती मंदिर ते एकनाथ तिरसे वस्ती,माहेगाव देशमुख चारी नं.६ ज्ञानेश्वर खैरनार वस्ती ते सुनील जाधव वस्ती,चारी नं.५ कदम वस्ती (शासकीय विहीर) ते कोळपेवाडी शिव, चारी नं.५ ग्रा.मा.३० ते कुंभारी शिव गोकुळ घुले घर,चांदगव्हाण ईजीमा १६० शिवाजी बाचकर वस्ती ते सुहास शिंदे शेत, कुंभारी प्रजिमा ८५ डॉ.कोपरे ते विजय कारभारी कदम घर,डाऊच बु.मच्छिंद्र दहे घर (चौफुली) होन वस्ती ते अर्जुन दहे घर,मढी बु.रा.मा.७ गवळी वस्ती ते ग्रा.मा.चारी नं.७,कोळपेवाडी माहेगाव शिव चारी नं.५ ते इजिमा १ पर्यंत शिव रस्ता, कोळपेवाडी माहेगाव शिव चारी नं.५ ते चारी नं.६ शिव रस्ता,धोत्रे शिवाजी आगवन शेत ते दत्तात्रय जामदार शेत,भोजडे शिवनाथ दिघे घर ते विक्रम सिनगर घर,कोकमठाण पुणतांबा रोड ते रमेश वाघ घर,वारी देवी मंदिर ते अनिल जाधव घर, कोकमठाण बारवाचे आळे ते राजेंद्र देशमुख घर, लौकी गाव ते कोटकर वस्ती,उक्कडगाव येथे जनार्दन स्वामी मंदिर ते आण्णा निकम घर (सुरेगाव रोड), कासली दत्तात्रय मलिक घर ते बाबासाहेब सुंबे घर,गोधेगाव ते कासली शिव रस्ता (हाडळ रस्ता),तिळवणी दगू शिंदे घर ते विष्णू वाघ घर,पढेगाव संवत्सर शिव रस्ता (जुना कॅनॉल)ते म्हसोबा वस्ती,ओगदी निवृत्ती पोळ घर ते राजाराम गोणटे घर,अंचलगाव लक्ष्मीमंदिर पासून शेख वस्ती ते दिलीप यंडाइत घर,मढी खु.जगन गवळी घर ते कैलास गवळी घर,देर्डे कोऱ्हाळे बाळू घाडगे घर ते नानासाहेब शिंदे घर,जवळके शांताराम दरेकर घर ते गणेश थोरात घर,जवळके दगुबाई थोरात घर ते तलाठी कार्यालय जवळके,पोहेगाव के.बी.रोहमारे घर ते संतोष वाके घर,देर्डे चांदवड गणपत गुंड घर ते रामचंद्र कोल्हे घर,चांदेकसारे नबाजी नन्नवरे घर ते दौलत आहेर घर,डाऊच खु.नारायण पुंगळ पाण्याची टाकी ते विक्रांत रोहमारे पोल्ट्री, डाऊच खु. विक्रांत रोहमारे पोल्ट्री ते रमेश रोहमारे घर,जळगाव–वाकडी-जळगाव रस्ता ते ज्ञानदेव आदमाने घर, जळगाव–वाकडी-जळगाव रस्ता ते दिनकर औताडे घर,वाकडी म्हसोबा मंदिर ते सोमनाथ लांडे घर,वाकडी श्रीराम मंदिर ते संतोष लांडे घर,पुणतांबा धन्वंतरी पतसंस्था कार्यालय ते संजय शेळवंटे घर,पुणतांबा अनिल उदावंत घर ते सचिन थोरात घर,रामपूरवाडी चांगदेव सांबारे घर ते शिवाजी जगताप घर,रामपूरवाडी संपत शेळके घर ते शाम जगताप घर,मढी बु.रेवजी गवळी शेत ते मारुती मोकळ घर,मढी बु.एकनाथ गवळी शेत ते स्मशानभूमी मढी बु.,मढी बु.उंबरी नाला ते संभाजी आभाळे घर या रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख रु.तसेच संवत्सर शांताराम गायकवाड घर ते  दिलीप बोरनारे वस्ती या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणसाठी २० लाख रु.असा एकूण ५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे ना.आशुतोष काळे यांनी आभार मानले असून उर्वरित रस्त्यांना निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments