Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

भारत स्काऊट राज्य पूरस्कार साठी अथर्व भवरची निवड.

  भारत स्काऊट राज्य पूरस्कार साठी अथर्व भवरची निवड. 

 कोपरगाव प्रतिनिधी:----  मुंबई येथे भारत स्काऊट आणि गाईडचा राज्य पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांचे हस्ते होणार आहे. त्यासाठी सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी अथर्व संजय भवर याची अहमदनगर जिल्यातून  निवड करण्यात आली आहे. 

      सन  २०१८-१९  साली  रामबाग भोर,  पुणे येथे झालेल्या राज्य पुरस्कार परिक्षेमधे  सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी अथर्व भवर याने भाग घेतला होता. ही परिक्षा  महाराष्ट्रातील सर्व स्काऊटसाठी होती .  त्यात राज्य पुरस्कारासाठी निवड  झालेल्या विद्यार्थ्यांनचा  राज्य पुरस्कार प्रमाणपत्र  सोहळा दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांचे हस्ते स्काऊट गाईड पॅव्हिलियन , दादर येथे संपन्न होणार आहे. या राज्य पुरस्कार सोहळा  कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातून दोन स्काऊट व दोन गाईड ची  निवड करण्यात आली असुन त्यात अथर्व भवरचा समावेश आहे.  जिल्हा  संघटक [ स्काऊट] जी. जे. भोर, सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या मी,मॅनेजर सिस्टर झेलमा परेरा ,  प्राचार्या  सिस्टर जोयलेट परेरा  व स्काऊट मास्टर  ज्ञानदेव घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल  अथर्वचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments