भाजपला रामराम करून सुरेगावचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथील भाजप कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती सुरेगाव येथील भाजप कार्यकर्त्यांनी केली असून सुरेगावचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.
यामध्ये रविंद्र वाबळे, किशोर वाबळे, सोपान कदम, दिगंबर कदम या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षाच्या काळात विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. मतदार संघातील रस्ते, पाणी, आरोग्य असे अत्यंत महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत ते देखील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत. त्यामुळे विकासाचे व्हिजन असलेलं नेतृत्व कोपरगाव विधानसभा मतदार संघाला त्यांच्या रूपाने लाभले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव वाबळे, कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, भैय्यासाहेब वाबळे, श्रीधर कदम, रविंद्र देवकर, सुदाम वाबळे, नानासाहेब कदम, मनोज वाबळे, शांताराम वाबळे, अमोल वाबळे, गणेश सुपनर, मयुर सारडा आदी
0 Comments