आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ईस्लामवाडी (चांदेकसारे) कमी उंचीच्या डक्टला पर्यायी रुंद व भक्कम मार्ग गायत्री कन्स्ट्रक्शन देईल – ना. आशुतोष काळे

 ईस्लामवाडी (चांदेकसारे) कमी उंचीच्या डक्टला

पर्यायी रुंद व भक्कम मार्ग गायत्री कन्स्ट्रक्शन देईल – ना. आशुतोष काळेकोपरगाव प्रतिनिधी:----कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या चांदेकसारे शिवारात उभारण्यात आलेल्या डक्टची उंची कमी असून तांत्रिकदृष्ट्या या डक्टची उंची वाढविणे शक्य नाही. त्यामुळे या डक्टची उंची कमी असल्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पर्यायी रुंद व भक्कम मार्ग गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी करून देईल असा यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

            कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात ईस्लामवाडी (चांदेकसारे) शिवारात उभारण्यात आलेल्या डक्टची उंची कमी असल्याबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी बाबत समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शनचे अधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांची ना. आशुतोष काळे यांनी बैठक घेतली. या बैठकीत या कमी उंची असलेल्या डक्टची उंची वाढविली जावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. त्यावेळी डक्टची उंची वाढविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे डक्टची उंची वाढविण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यावेळी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रुंद व भक्कम मार्ग गौयत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने तयार करून द्यावा यावर नागरिकांनी सहमती दर्शवून अधिकाऱ्यांनी देखील होकार दिला आहे. ना. आशुतोष काळेंनी अधिकारी व नागरिकांची बैठक घेवून समन्वय साधत योग्य मार्ग काढला त्याबद्ल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या बैठकीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गायत्री कन्स्ट्रक्शनचे बांगर, राज कन्स्ट्रक्शनचे अधिकारी, सुधाकर होन, देर्डे चांदवडचे सरपंच योगिराज देशमुख, मगन शिलेदार, ज्ञानेश्वर होन, डॉ.गायकवाड, संदीप कोल्हे, बिपिन गवळी, डॉ. संतोष आभाळे, मोहनराव आभाळे, सय्यदबाबा शेख, मोहनराव पवार, दादासाहेब होन आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments