Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

आजोबानेच केला आपल्या नातवाचा खून, गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून परस्पर लावली मृतदेहाची विल्हेवाट कोपरगाव तालुक्यातील घटना

 आजोबानेच  केला आपल्या नातवाचा खून, गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून परस्पर लावली मृतदेहाची विल्हेवाट

कोपरगाव तालुक्यातील घटनाकोपरगावगाव प्रतिनिधी :--  तीन चारी चासनळी शिवारात राहणाऱ्या चंदर उर्फ चंद्रभान राम गोधडे वय 50 राहणार तीनचारी चासनळी शिवार तालुका कोपरगाव यांनी आपला नातू चिरंजीव अथर्व अनिल गायकवाड वय ६ याला चापटी तसेच काठीने अवघड ठिकाणी मारून खून केल्याची घटना घडली असून कारण मात्र अस्पष्ट आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील तीन चारी चासनळी शिवारात राहणाऱ्या चंदर उर्फ चंद्रभान राम गोधडे वय ५० याने गुरुवार दि ३१ मार्च रोजी रात्री १०वाजेच्या सुमारास त्यांचा नातू अथर्व याला आगोदर हाताने चापटी मारल्या व नंतर लाकडी काठीने अथर्वच्या अवघड ठिकाणी फटका मारला यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या गुन्ह्याची कुणाला माहीती होवू नये यासाठी आरोपी याने पुरावा नष्ट करण्यासाठी नवीन आदिवासी स्माशानभुमीच्या काटवनामध्ये मृतदेह पुरून पुरावा नष्ट केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली यावर त्यांनी पंचांसमक्ष आरोपीला घेऊन मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. याबाबत प्रकाश रंगनाथ शिंदे वय 49 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर -i११७/२०२० कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करत आहे.

Post a Comment

0 Comments