Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे ना. आशुतोष काळेंनी केले स्वागत

 पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे ना. आशुतोष काळेंनी केले स्वागतकोपरगाव प्रतिनिधी:---- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ जिल्हास्तरीय कोरोना उपाय योजना व लसीकरण आढावा बैठकीसाठी अहमदनगर येथे जाण्यासाठी त्यांचे शिर्डी श्री साईबाबा विमानतळावर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मतदार संघाचा रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यास मोठी मदत झाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी पालक मंत्र्यांना सांगितले. त्याबद्दल कोपरगाव मतदार संघातील नागरिकांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार करून आभार मानले.यापुढील काळात देखील मतदार संघाच्या रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी देवून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अथक प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून गावागावातील रस्त्यांची कामे मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिन मुजगुले, संजय रोहमारे, प्रभाकर गुंजाळ, शशिकांत लोळगे, बाबासाहेब गुंजाळ, रावसाहेब कोल्हे, किरण भालेराव, गोकुळ कांडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments